फक्त शिवाजी नाही, आता 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' म्हणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 06:19 AM2018-08-31T06:19:35+5:302018-08-31T06:20:14+5:30

फक्त शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळ. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांची अशा प्रकारे जगाला ओळख होणार

Just not Shivaji, now say 'Chhatrapati Shivaji Maharaj International Airport' ... | फक्त शिवाजी नाही, आता 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' म्हणा...

फक्त शिवाजी नाही, आता 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' म्हणा...

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर 

मुंबई : फक्त शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज मुंबईविमानतळ. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांची अशा प्रकारे जगाला ओळख होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी ट्विट करत याची माहिती दिली. ‘महाराष्ट्रातील जनतेचे मी अभिनंदन करत असून त्यांची अनेक वर्षांची ही मागणी पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो,’ असेही त्यांनी म्हटले आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी ही घटना मुंबईकर व देशवासीयांना अभिमान वाटावा अशी असल्याचे सांगितले.

मुंबईतील विमानतळाच्या नावात महाराज ही उपाधीच निर्देशित करण्यात आलेली नव्हती. लोकमतने याबाबत वारंवार आवाज उठवला होता. १९९० पासून महाराज ही उपाधी निर्देशित करण्यासाठी वॉच डॉग फाउंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड. ग्राडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनीदेखील प्रयत्न केले आहेत. खासदार शेट्टी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: शिवप्रेमी आहेत. २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधानांनी रायगड किल्ल्यावर जाऊन नारळ फोडून केला होता. महाराज ही उपाधी या दोन्ही विमानतळांच्या नामकरणात निर्देशित करण्यासाठी शिवप्रेमी म्हणून आपण स्वत: पंतप्रधान व प्रभू यांच्याकडे आवाज उठवला. मागणी पूर्ण झाली.

शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या नेतृवाखाली शिवसैनिकांनी व महिला आघाडीने महिनाभरापूर्वी महाराज या उपाधीसाठी गनिमी कावा करत सांताक्रुझ पूर्व येथील आंतरदेशीय विमानतळावर आंदोलन केले होते. महाराज उपाधी लागण्याचे श्रेय सेनेचे असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

Web Title: Just not Shivaji, now say 'Chhatrapati Shivaji Maharaj International Airport' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.