अवघ्या एका महिन्यात कोरोनाची उंचाकी १० हजार ८६१ नव्या रुग्णांची नोंद, तर १५२ जणांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 10:57 AM2020-10-01T10:57:21+5:302020-10-01T10:58:57+5:30

सप्टेंबर महिना सुरु झाला आणि शहरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. अवघ्या महिनाभरात ठाण्यात कोरोनाचे नवीन १० हजार ८६१ रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १५२ जणांचा मृत्युही झाला आहे.

In just one month, 10,861 new cases of coronary heart disease were reported and 152 deaths were reported | अवघ्या एका महिन्यात कोरोनाची उंचाकी १० हजार ८६१ नव्या रुग्णांची नोंद, तर १५२ जणांचा मृत्यु

अवघ्या एका महिन्यात कोरोनाची उंचाकी १० हजार ८६१ नव्या रुग्णांची नोंद, तर १५२ जणांचा मृत्यु

Next

ठाणे : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत असतांना ठाण्यात मागील सप्टेंबरच्या एका महिन्यात दिवसात कोरोनाच्या नवीन १० हजार ८६१ रुग्णांची भर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात हॉटस्पॉट ठरलेले माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे आहेत. तर याच कालावधीत १५२ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध स्वरुपाचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरु झाला आणि ठाण्यातही कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर महिन्यात परराज्यातून येणाऱ्या मजुरांमुळे आणि सोशल डिस्टेसींगचे पालनही ठाणेकरांकडून होत नसल्याचे रुग्णांची वाढ झाल्याचे दिसत आहे. आजही शहराच्या अनेक भागात मार्केटमध्ये नागरीकांची गर्दी दिसत आहे. तोंडाला मास्क लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे आवाहन पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. परंतु तरीही त्याकडे कानडोळा होतांना दिसत आहे, ठाणे परिवहन सेवेच्या बसमध्ये गर्दी दिसून येत आहे. एकूणच यामुळेच आता सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
आॅगस्ट अखेर पर्यंत महापालिका हद्दीत प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १७४५ एवढी होती. तर सप्टेंबर अखेर यात वाढ होऊन ३६५९ रुग्ण आजच्या घडीला उपचार घेत आहेत. तर आॅगस्ट अखेर पर्यंत शहरात ८३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता. आता हाच आकडा ९९५ वर गेला असून सप्टेंबर महिन्यात तब्बल १५२ जणांचे मृत्यु झाले आहेत. तर अवघ्या महिनाभरात महापालिका हद्दीत १० हजार ८६१ नव्या रुग्णांची भर पडली असून याच कालावधीत ८ हजार ५७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रिकव्हीर रेट हा ९० टक्यांवरुन आता ८७ टक्यांवर आला आहे. त्यातही माजिवडा मानपाडा या प्रभाग समितीत रोजच्या रोज ५० ते १०० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आॅगस्ट प्रमाणेच सप्टेंबर महिना देखील माजिवडा - मानपाडा प्रभाग समिती हॉटस्पॉट ठरली आहे.


 

Web Title: In just one month, 10,861 new cases of coronary heart disease were reported and 152 deaths were reported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.