Join us

कोविड योद्ध्यांना नुसताच मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविड काळात जीव धोक्यात घालून बाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविड काळात जीव धोक्यात घालून बाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून संबोधण्यात येते. पण या योद्ध्याची अवस्था आता गरज सरो वैद्य मरो अशी झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे हळूहळू कोरोना काळजी केंद्रे बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे येथे काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागत आहे. याविरोधात गोरेगाव पूर्व, नेस्को केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यात आंदोलनही केले होते. मात्र खासगी ठेकेदारांमार्फत चालविण्यात येत असलेल्या काही केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांना वेतनही मिळालेले नाही. असे एक प्रकरण वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रामध्ये उजेडात आले आहे.

किती कंत्राटी कर्मचारी घेतले - सुमारे चार (जंबो कोविड केंद्र)

सध्या सुरू असलेले कोविड काळजी केंद्रे - ६० टक्के बंद केले.

मान दिल्याने पोट भरत नाही..

कोविड संसर्गाच्या भीतीने नातलगही पळ काढत होते. आम्हाला नोकरीची संधी मिळाली, म्हणून काम केले हे मान्य. पण गेले वर्षभर मनोभावे रुग्णांची सेवा करीत आहोत. एकाएकी बाहेरचा रस्ता दाखविला तर आम्ही काय करायचे.

- वैद्यकीय कर्मचारी (कोविड काळजी केंद्र)

कर्मचाऱ्यांची वेतनासाठी पोलीस ठाण्यात धाव...

वांद्रे-कुर्ला कोविड केंद्रातील कंत्राटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. याप्रकरणी संबंधित एजन्सीविरोधात १२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. प्रत्येकाला १८ हजार रुपये दरमहा पगार देण्याचे कबूल केले होते. मात्र एप्रिलपासून पगार झालेला नाही. मात्र कंपनी व्यवस्थापनाने लवकरच वेतन देण्याचे आश्वासन दिल्याचे सूत्रांकडून समजते.