Join us

Video : प्रबळ राजकीय इच्छाशक्तीने आठ कोटी मुस्लिम महिलांना न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 7:51 PM

तिहेरी तलाक बंदीवर राज्यसभेची मोहोर हा ऐतिहासिक क्षण : विजया रहाटकर 

मुंबई - तिहेरी तलाकला बंदी घालणाऱ्या विधेयकाला अखेर राज्यसभेची मंजुरी ही ऐतिहासिक घटना आहे आणि त्यामुळे आठ कोटी मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे. एका प्रतिगामी आणि महिलांचे शोषण करणारया प्रथेला मुठमाती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. 

लोकसभेमध्ये हे विधेयक तीनदा मंजूर होऊनही त्यावर राज्यसभेत मंजुरीची मोहोर उमटत नव्हती.  सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण निकालानंतरही तिहेरी तलाकच्या कुप्रथेचे समर्थन काही राजकीय पक्ष करीत होते. पण सुदैवाने आता राज्यसभेची मंजूरी मिळाल्याने तिहेरी तलाकवर बंदी येणार आहे. महिलांच्या शोषणांविरुद्ध हे निर्णायक पाऊल आहे. एका जोखडातून त्यांची मुक्तता झाली आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखविल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि त्याचबरोबर सहकार्य करणारया सर्व पक्षांच्या खासदारांचे आभार मानते, असेही रहाटकर म्हणाल्या.  तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर तीन वर्षांपूर्वी आपण पंतप्रधानांना हजारो मुस्लिम महिलांचे निवेदन दिले होते, असेही रहाटकर यांनी सांगितले.

टॅग्स :तिहेरी तलाकमहिलामुस्लीमविजया रहाटकर