न्या. नरेश पाटील राज्याचे प्रभारी मुख्य न्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 06:17 AM2018-08-07T06:17:34+5:302018-08-07T06:17:51+5:30
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींनी ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांची सोमवारी नियुक्ती केली. आधीच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कमलेश ताहिलरामाणी यांची मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्याने न्या. पाटील यांची ही नियुक्ती झाली आहे. न्या. पाटील आॅक्टोबर २००१ पासून न्यायाधीश आहेत. न्या. ताहिलरामाणी मद्रासला केव्हा रुजू होणार हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्या मंगळवारपासून उपलब्ध नाहीत असे गृहित धरून ‘बोर्ड’ तयार केले आहेत. त्यानुसार मुख्य न्यायाधीशांच्या कोर्ट नं. १ मध्ये न्या. पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांचे खंडपीठ बसणार आहे.