मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर ५ डिसेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर या पदावर अन्य कोणाची नियुक्ती होईपर्यंत न्या. विजया ताहिलरमाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कामकाज सांभाळतील. न्या. ताहिलरमाणी तिस-यांदा मुंबई उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कामकाज पाहणार आहेत.मुख्य न्या. मोहित शहा निवृत्त झाल्यानंतर न्या. ताहिलरमाणी यांनी २०१५मध्ये हंगामी मुख्य न्यायाधीश पद सांभाळले होते. त्यानंतर मुख्य न्या. डी. एच. वाघेला २०१६मध्ये निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी काही महिने उच्च न्यायालयाचा कारभार सांभाळला.मुख्य न्या. चेल्लूर या मुंबई उच्च न्यायालयाच्या दुसºया महिला मुख्य न्यायाधीश आहेत. त्यांच्यापूर्वी न्या. सुजाता मनोहर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी वर्णी लागली होती. २६ सप्टेंबर २०१२मध्ये न्या. चेल्लूर यांची केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात झाली. गेले १५ महिने त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहात आहेत.
न्या. ताहिलरमाणी मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 2:05 AM