ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ ‘भजन संध्या’
By Admin | Published: March 20, 2015 10:47 PM2015-03-20T22:47:08+5:302015-03-20T22:47:08+5:30
‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : ‘लोकमत’ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि ‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन करण्यात आले आहे. दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क मैदानासमोरील वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
सभागृह येथे सोमवार २३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता भजन संध्याचा कार्यक्रम होणार आहे.
महाराष्ट्र आणि गोवा येथे सखी मंचच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणाचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांना संगीतात विशेष रुची होती. त्यांनी आयुष्यभर स्वरांची साधना केली. त्यांच्या संगीत साधनेचा आदर करीत मागील वर्षी त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘भजन संध्या’चे सादरीकरण करण्यात आले होते. आज ज्योत्स्ना दर्डा आपल्यात नाहीत, पण त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून ‘सखी मंच’चा प्रवास अविरत सुरू आहे.
श्रद्धेय ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘भजन संध्या’ मध्ये हिंदी-मराठी भजनांच्या स्वरूपात आपल्या सुमधुर आवाजाने चिंतामणी सोहोनी आणि विद्या करलगीकर संचासह भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन ‘लोकमत’ सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)