ज्योत्स्ना दिघे यांचा भाजपात प्रवेश

By admin | Published: May 15, 2017 12:54 AM2017-05-15T00:54:07+5:302017-05-15T00:54:07+5:30

काँग्रेसच्या माजी नगरसेविका व काँग्रेसच्या उत्तर पश्चिम महिला जिल्हाध्यक्षा ज्योत्स्ना दिघे यांनी, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात

Jyotsna Dighe's entry into BJP | ज्योत्स्ना दिघे यांचा भाजपात प्रवेश

ज्योत्स्ना दिघे यांचा भाजपात प्रवेश

Next

मनोहर कुंभेजकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेसच्या माजी नगरसेविका व काँग्रेसच्या उत्तर पश्चिम महिला जिल्हाध्यक्षा ज्योत्स्ना दिघे यांनी, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस गुरुदास कामत यांच्या कट्टर समर्थक म्हणून दिघे यांची ओळख आहे. त्यांच्या पक्षप्रवेशात वर्सोव्याच्या भाजपा आमदार भारती लव्हेकर यांनी भूमिका बजावली.
ज्योत्स्ना दिघे यांच्या भाजपा प्रवेशामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला फटका बसला असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपाला वर्सोवा विधानसभा मतदार संघात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत होईल. दरम्यान, ज्योत्स्ना दिघे यांच्या पक्षप्रवेशावेळी आमदार भारती लव्हेकर, प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर, नगरसेविका रंजना पाटील, संजय तिथलानी, हेमंत नायर, काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ६०च्या महिला अध्यक्षा वीणा डिग्यांनी आदी मान्यवर उपस्थित होते. ज्योत्स्ना दिघे या २००२ ते २००६ पर्यंत शिवसेनेच्या डी. एन. नगर विभागातील नगरसेविका होत्या.
मात्र, त्यांनी नंतर २००६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या पालिका निवडणुकीपर्यंत त्या के पश्चिम विभागातील काँग्रेसच्या नगरसेविका होत्या, तर २०१० पासून आजपर्यंत त्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या काँग्रेसच्या महिला अध्यक्षा होत्या.

Web Title: Jyotsna Dighe's entry into BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.