Join us

के. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात हूनर महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:05 AM

मुंबई : विद्याविहार येथील के. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात (स्वायत्त) हूनर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

मुंबई : विद्याविहार येथील के. जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात (स्वायत्त) हूनर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची संकल्पना एलिजियम् अशी आहे. हा महोत्सव ११, १२, १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महोत्सवाचे यंदा २७वे वर्ष आहे. महोत्सव प्राध्यापिका डॉ. वीणा सानेकर आणि कल्चरल कोऑर्डिनेटर प्राध्यापिका मीरा व्यंकटेश व इतर शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. तर जनरल सेक्रेटरी मंगेश गिरी, जॉइंट सेक्रेटरी श्रेया गांगल हेदेखील महोत्सवाचे काम पाहत आहेत. या वर्षी महोत्सव ऑनलाइन पद्धतीने लेक्चर्सची वेळ पाळून दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेमध्ये आयोजित करण्यात आला आहे. विजेत्या महाविद्यालयांना ट्रॉफी आणि विजेत्यांना ई-सर्टिफिकेट मिळणार असून, महोत्सवाची नोंदणी सुरू झाली आहे. हूनर आजकालच्या युवा पिढीसाठी, आजकालच्या युवा पिढीतर्फे आयोजित केले जाते. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये एलिजियम् म्हणजे स्वर्ग; असा स्वर्ग जिथे आपल्याला गर्दीतसुद्धा शांतता सापडू शकते. म्हणून संकल्पना निवडली आहे. कलेला वाव मिळाला म्हणून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सूर मल्हार, ताल मल्हार आणि नृत्याविष्कार या कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते.