मुंबईतील के वेस्ट वॉर्डने साधली अशुद्ध पाण्याला शुद्ध करण्याची किमया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 03:18 PM2018-03-28T15:18:16+5:302018-03-28T15:18:16+5:30

देशाची आर्थिक राजधानी  असलेल्या मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. मुंबईत ब्रिटिश काळापासून सांडपाणी थेट समुद्रात सोडणारी यंत्रणा कार्यरत आहे. याशिवाय शहरातील सांडपाणी, कारखान्यांमधून येणारी रसायनेदेखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडली जातात.

The K West Ward in Mumbai, cleansing the impure water | मुंबईतील के वेस्ट वॉर्डने साधली अशुद्ध पाण्याला शुद्ध करण्याची किमया

मुंबईतील के वेस्ट वॉर्डने साधली अशुद्ध पाण्याला शुद्ध करण्याची किमया

Next

 - मनोहर कुंभेजकर
मुंबई -  देशाची आर्थिक राजधानी  असलेल्या मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. मुंबईत ब्रिटिश काळापासून सांडपाणी थेट समुद्रात सोडणारी यंत्रणा कार्यरत आहे. याशिवाय शहरातील सांडपाणी, कारखान्यांमधून येणारी रसायनेदेखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडली जातात.त्यामुळे अशा पाण्याचा परिणाम समुद्री जीवांवर होऊन समुद्र संपदा धोक्यात आली आहे.अनेक आश्वासनं मिळतात मात्र सांडपाण्यावर पुनः प्रक्रिया होत नाही.यावर ठोस उपाययोजना म्हणून महानगरपालिकेच्या के- पश्चिम विभागाचे प्रभाग समितीचे अध्यक्ष व प्रभाग क्रमांक 60 चे भाजपा नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी पुढाकार घेऊन गटारातील घाण पाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ करून दाखवण्याची किमया साधली आहे.
  मनपा के- पश्चिम विभागातील त्यांच्या दालनात काल दुपारी गटारातील घाण पाण्यावर प्रक्रिया करण्याचा यशस्वी करण्यात आला.यावेळी स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज विभागाचे सहाय्यक अभियंता अनिल मिस्त्री,वर्सोवा पंपिंग स्टेशनचे असिस्टंट इंजिनियर सा.ज.खर्डे, पर्यावरण विभागाचे सहाय्यक अभियंता महेंद्र कांबळे, सहाय्यक विश्लेषक मंगेश हळदणकर, दुय्यम अभियंता पश्चिम उपनगरे रमेश मुरारी, सहाय्यक अभियंता मलनि: स्सारण प्रचलन वि.द.कुलकर्णी, दुय्यम अभियंता मुंबई मलनि:स्सारण प्रकल्प विशाल लाटे, दुय्यम अभियंता जलविभाग विपुल बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रयोगाबद्दल बोलताना दाभाडकर म्हणाले," आम्ही प्रभाग क्रमांक ६० मधल्या सांडपाण्याच्या मोगरा नाल्यातील पाण्याचे नमुने घेऊन ऑर्गेनिक प्रक्रिया करून १० मिनिटांत पाणी स्वच्छ करण्यात यश मिळवले आहे. पुढील काही दिवसांत हा पायलट प्रकल्प म्हणून मोगरा नाल्यावर यशस्वीरित्या पार पाडणार आहोत. त्या अनुषंगाने मोगरा नाल्यात वाहून येणारे फ्लोटिंग मटेरियल काढून त्यानंतर पाण्यावर ऑर्गेनिक प्रक्रिया करून त्यातील गाळ आणि शुध्द पाणी हे १० मिनीटांत वेगळे करून त्यातील गाळ बाजूला काढून शुध्द पाणी समुद्रात सोडणार. जेणेकरून समुद्री प्रदूषण १०० टक्के संपवता येईल."  
या प्रयोगाबाबत आणि पाण्याची शुद्धतेबद्दल बोलताना सहाय्यक विश्लेषक मंगेश हळदणकर म्हणाले की, " प्रथमदर्शनी पाण्यावरील प्रक्रियेचा हा प्रयोग फार आशादायी वाटतो. के पश्चिम प्रभाग समितीच्या कार्यालयात सादर केलेल्या सांडपाण्याच्या प्रयोगातून पाण्याचे नमुने जी-उत्तर येथील महापालिका लॅब मध्ये तपासणीकरता पाठवण्यात यावेत आणि अहवाल तपासूनच पडताळणी करावी."

 मुंबईचा पाणीप्रश्न हा एक ज्वलंत विषय आहे आणि तो सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याअनुषंगाने जर आपण अशापध्दतीने वापरलेले पाणी ऑर्गेनिक फिल्टर वापरून ते टॉयलेट फ्लश, गार्डनिंग, कपडे-भांडी धुण्याकरता वापरू शकतो.  या कामांसाठी आपण ७५ टक्के पाणी वापरतो आणि २५ टक्के पाणी पिण्यासाठी,अन्नपदार्थ शिजवण्यासाठी वापरले जाते.  म्हणजेच आर्गेनिक फिल्टरने ७५ टक्के पाण्याची गरज आपण हे पाणी वारंवार वापरून कालांतराने संपुष्टात आणू शकतो.

आज पिण्यासाठी सुध्दा पाणी मिळत नाही.मात्र अशा अभिनव प्रयोगाने आपण पुन्हा एकदा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देऊ शकतो. "सध्या के पश्चिम विभागात दररोज सुमारे २५ कोटी लीटर पाणी पुरवले जाते.त्यापैकी जवळपास ८-१० कोटी लीटर पाणी गळतीमधून वाया जाते त्यामुळे ब-याचशा भागात आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा होत नाही.मात्र अशा प्रयोगामुळे पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. मुंबई हे चहूबाजूंनी समुद्राने वेढलेले एक बेट आहे. मात्र मुंबईतील सांडपाणी तसेच गटाराचे पाणी ब-याच ठिकाणी कुठलीही प्रक्रिया न तसेच समुद्रात सोडले जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्री प्रदूषण होते. याचा थेट परिणाम समुद्री जीवांवर तसेच मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या कोळीबांधवांवरही होत आहे.

सागरी प्रदूषण रोखण्यासाठी गटार तसेच सांडपाणी समुद्रात सोडले जाते ते जर अशाप्रकारे ऑर्गेनिक प्रक्रिया करून सोडले तर निश्चितच मुंबई व त्यासभोवतालचा समुद्र प्रदूषणमुक्त होईल आणि मत्स्यव्यवसायावरील संकट दूर होईल. तसेच आपण जर मुंबईचा समुद्रकिनारा स्वच्छ करू शकलो तर स्वच्छ समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल" असा विश्वास दाभाडकर यांनी शेवटी व्यक्त केला.

Web Title: The K West Ward in Mumbai, cleansing the impure water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.