कंत्राटदारावर पालिका मेहेरबान, कचरा वाहतुकीसाठी १६ कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 12:14 PM2024-01-14T12:14:45+5:302024-01-14T12:22:50+5:30

कुर्ला-महालक्ष्मी रेफ्युज ट्रान्स्फर येथील कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी पालिका १६ कोटी रुपये मोजणार आहे.

कचरा हस्तांतरण केंद्रातून कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर | कंत्राटदारावर पालिका मेहेरबान, कचरा वाहतुकीसाठी १६ कोटी!

कंत्राटदारावर पालिका मेहेरबान, कचरा वाहतुकीसाठी १६ कोटी!

मुंबई :  मुंबईत रोज सहा हजार मेट्रिक टन कचरा गोळा होत आहे. स्वच्छ मुंबई अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका विविध उपाययोजना आखत आहे.

कुर्ला-महालक्ष्मी रेफ्युज ट्रान्स्फर येथील कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी पालिका १६ कोटी रुपये मोजणार आहे. कचरा वाहून नेण्याचे हे कंत्राट फक्त वर्षभरासाठी देण्यात येणार आहे. मात्र, कंत्राटदारावर पालिका मेहेरबान असून, मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

२०१७-१८ मध्ये दरदिवशी ७ हजार ३५० मेट्रिक टन कचरा दरदिवशी निर्माण होत होता. कचऱ्याचे हे प्रमाण कमी झाले असून २०२१-२२  च्या आकडेवारीनुसार सध्या दरदिवशी ६३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. 

पालिकेने निविदा मागविल्या
महालक्ष्मी व कुर्ला येथे रेफ्यूज ट्रान्स्फर स्टेशन आहेत. याठिकाणी संकलित करण्यात आलेला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. महालक्ष्मी व कुर्ला रेफ्यूज ट्रान्स्फर स्टेशनमधील कचरा या दोन्ही डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणार आहे. महालक्ष्मी व कुर्ला रेफ्यूज ट्रान्स्फर स्टेशनमधील कचरा कांजूर व देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकणे, यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत.

असा होणार खर्च
  देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कुर्ला रेफ्यूज ट्रान्स्फर स्टेशनमधील कचरा टाकण्यासाठी ६ कोटी ९९ लाख ८८ हजार ७५० रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे. 
  महालक्ष्मी रेफ्यूज ट्रान्स्फर स्टेशनमधील कचरा कांजूर व देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी ९ कोटी १४ लाख ७४ हजार ११० रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: कचरा हस्तांतरण केंद्रातून कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई