कांदिवली ते दहिसर भागात साचले कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 02:31 AM2018-11-16T02:31:45+5:302018-11-16T02:32:03+5:30

नवीन कंत्राटदाराला विरोध : कामगार संघटनांचे काम बंद

Kadivali to Dahisar area gets scrap copper | कांदिवली ते दहिसर भागात साचले कचऱ्याचे ढीग

कांदिवली ते दहिसर भागात साचले कचऱ्याचे ढीग

Next

मुंबई : पालिकेच्या आर उत्तर, आर मध्य व आर दक्षिण विभागात कचऱ्यांच्या गाड्यांचा पुरवठा करण्याचे नवीन कंत्राट ठाणे येथील एजी इन्व्हारो इन्फ्राप्रोजेकट प्रायव्हेट लिमिटेड या नव्या कंत्राटदाराला १३ नोव्हेंबरपासून देण्यात आले आहे. त्यास कामगार संघटनांनी विरोध करून तीन दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे कांदिवली, बोरीवली व दहिसर येथील कचरा उचलण्याची सेवा गेले तीन दिवस ठप्प झाली आहे. परिणामी आर उत्तर, आर मध्य, आर दक्षिण विभागात मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचले असून पालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे येथे रोगराई पसरण्याची भीती शिवसेनेच्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

येथील कचरा सेवा पूर्ववत करण्यासाठी गुरुवारी आर उत्तर व आर मध्य येथील नगरसेवकांनी कामगार संघटना आणि कंत्राटदार यांच्यासोबत चर्चा करून कचरा लवकरात लवकर उचलला जावा, अशी विनंती करण्यात आली असल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली. कामगार संघटनांनी उद्यापासून पूर्ववत काम सुरू होईल, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने कामगार संघटनांना विश्वासात न घेता नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यामुळे पूर्वी कचरा उचलणाºया या तीन वॉर्डमधील सुमारे २५० ते ३०० कचरा उचलणाºया कामगारांना आता तुम्ही कचरा उचलू नका, असे सांगून त्यांना मोटार लोडरऐवजी अचानक कचरा साफ करण्याचे काम सोपवले असल्याचा आरोप म्युनिसिपल मजदूर कामगार सेनेने केला. पूर्वी पालिकेचे सहा कामगार हे काम करत होते. मात्र नवीन कचरा उचलणारा कंत्राटदार त्याच्याकडील ड्रायव्हरसह एकूण दोन कामगार कचरा उचलणार असल्याने येथील कचरा उचलण्याचे काम संथगतीने होणार असल्याची भीती शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली. पालिकेकडे सर्व यंत्रणा व कचरा उचलणारे कामगार, गाड्या असताना उगाच मुंबईकरांचा पैसा खर्च करून बाहेरच्या कंत्राटदाराला काम देण्यात प्रशासनाची भूमिका काय, असा सवाल लोकप्रतिनिधींकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी पालिकेच्या आर मध्य विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कचरा उचलण्याचे काम संथगतीने सुरू असून, पूर्वीच्या कंत्राटदाराचे पाच वर्षांचे कंत्राट संपल्याने स्थायी समितीने मंजूर केलेल्या नव्या कंत्राटदाराला प्रशासनाने काम दिले आहे. येथे पूर्वी काम करणाºया कामगारांमध्ये कोणतीही कपात केली नसून उलट कचरा उचलणाºया अनेक कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

कचरा प्रश्नी आझाद मैदानात आंदोलन
च् पालिका प्रशासनाविरोधात पालिका सफाई कामगार बुधवारी आक्रमक होऊन आझाद मैदानात आंदोलनास बसले होते. कामगार संघटनांनी मागील दोन दिवसांपासून संप सुरू आहे. साफसफाई होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. पालिका प्रशासनाने कामगार संघटनांना विश्वासात न घेता नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली. पालिका प्रशासनाने हंगामी कर्मचाºयांना काम बंद करण्याचे आणि कायमस्वरूपी कर्मचाºयांचे इतर विभागात समायोजन करीत असल्याचे म्युनिसिपल मजदूर कामगार सेनेचे चिटणीस संजय वाघ यांनी सांगितले.
 

Web Title: Kadivali to Dahisar area gets scrap copper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.