वरळी मुख्यालयातून काडतूस चोरी प्रकरण, चौघा पोलिसांचे निलंबन होणार, आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:29 AM2017-12-12T01:29:53+5:302017-12-12T01:30:01+5:30

वरळी सशस्त्र दलाच्या(एलए-३) ६० जिवंत काडतुसांच्या (राउंड) चोरीप्रकरणी चौघा पोलीस कॉन्स्टेबलची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात येणार आहे. मंगळवारपर्यंत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. मात्र, त्याबाबत नेमकी माहिती देण्यास वरिष्ठ अधिकाºयांकडून टाळाटाळ केली जात आहे.

Kadutu theft case from Worli headquarter, the suspension of the four police officers, today's decision | वरळी मुख्यालयातून काडतूस चोरी प्रकरण, चौघा पोलिसांचे निलंबन होणार, आज निर्णय

वरळी मुख्यालयातून काडतूस चोरी प्रकरण, चौघा पोलिसांचे निलंबन होणार, आज निर्णय

Next

- जमीर काझी

मुंबई : वरळी सशस्त्र दलाच्या(एलए-३) ६० जिवंत काडतुसांच्या (राउंड) चोरीप्रकरणी चौघा पोलीस कॉन्स्टेबलची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात येणार आहे. मंगळवारपर्यंत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. मात्र, त्याबाबत नेमकी माहिती देण्यास वरिष्ठ अधिकाºयांकडून टाळाटाळ केली जात आहे.
शनिवारी रात्री घडलेले हे प्रकरण कसल्याही तक्रारीविना परस्पर दडपण्यात येत होते. मात्र ‘लोकमत’ने ते चव्हाट्यावर आणल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. ‘एलए-३’च्या मुख्यालयातून त्या घटनेबाबतची सविस्तर माहिती वरळी पोलिसांकडे देण्यात आली. तर ज्याच्या ताब्यातून काडतुसे लंपास झाली होती, त्या कॉन्स्टेबल संकेत माळी याच्यासह तेथे ड्युटीवर असलेल्या अन्य तिघा पोलिसांवर कारवाईचा अहवाल बनविण्यात आला. वरळीतून चोरलेली काडतुसे दादर परिसरात मिळाली होती, त्यामुळे त्याबाबत दादर पोलिसांनाही कळविण्यात आले. मात्र, सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्याचप्रमाणे याबाबत नेमकी माहिती सांगण्यास सर्व वरिष्ठ अधिकाºयांकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे पोलिसांची काडतुसे एका पोलिसाकडून चोरण्याची घटना घडूनही त्याबाबतचा नेमका प्रकार स्पष्ट होऊ शकला नाही.
वरिष्ठ अधिकाºयांकडून मिळालेला प्रतिसाद असा :
मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘मी एका कार्यक्रमासाठी मुंबईबाहेर आहे. त्यामुळे नेमकी काय कारवाई करण्यात आली याबाबत माहिती नाही.’
सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती म्हणाले, ‘हा विषय माझ्या अखत्यारीत नाही. त्याबाबत‘एलए’च्या अपर आयुक्तांकडून माहिती घ्या.’
अपर आयुक्त अस्वती दोरजे यांच्याशी सातत्याने दोन तास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मोबाइल उचलला नाही. कॉल कट करीत राहिल्या. मेसेज पाठविला असता त्याला प्रतिसाद देण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही.
परिमंडळ-३ चे उपायुक्त वीरेंद्र मिश्रा म्हणाले, ‘ संबंधित घटनेची माहिती ‘एलए’कडून देण्यात आली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
‘एलए-३’च्या उपायुक्त सुनीता साळुंके-ठाकरे म्हणाल्या, ‘संबंधित घटनेवेळी ड्युटीवर असलेल्या चौघांना निलंबित केले जाईल, ज्याने काडतुसे चोरली होती तो हवालदार पाटील आमच्या अस्थापनेवर नाही. त्यामुळे त्याच्यावरील कारवाईचा निर्णय वरिष्ठ अधिकाºयांकडून घेतला जाईल. त्याचप्रमाणे गुन्हा दाखल करण्याबाबतचा निर्णय मध्य परिमंडळाच्या अप्पर आयुक्ताकडून घेतला जाईल. त्याबाबत मी काहीही सांगू शकत नाही.’ त्यानंतर त्यांच्याकडे संबंधित कर्मचाºयांच्या नावाची विचारणा केली असता काहीही प्रतिसाद दिला नाही.
मध्य विभागाचे अपर आयुक्त जयकुमार यांच्याशी बराच वेळ संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला, मात्र त्यांनीही काही प्रतिसाद दिला नाही. तर पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते उपायुक्त दीपक देवराज यांनी
आपण रजेवर बाहेरगावी
असल्याने काहीही माहीत नसल्याचे सांगितले.


मुख्यमंत्र्यांनीच हस्तक्षेप करावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी पारदर्शी कारभाराचा आग्रह धरत असताना त्यांच्याच अखत्यारीतील मुंबई पोलिसांकडून हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने हे प्रकरण दडपले जात आहे. त्यामुळे त्यांनीच पोलीस अधिकाºयांना पारदर्शी कारभार करण्याबाबतचे धडे द्यावेत, अशा प्रतिक्रिया या प्रकरणी व्यक्त होत आहेत.

Web Title: Kadutu theft case from Worli headquarter, the suspension of the four police officers, today's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस