मेट्रो-३ प्रकल्पबाधितांसाठी काळबादेवी, गिरगाव हाइट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 01:15 AM2019-03-12T01:15:04+5:302019-03-12T01:15:34+5:30

प्राधिकरणाचा आराखडा तयार; निवासी संकुले राहणार उभी

Kalbadevi, Girgaum Highs for Metro-3 Projects | मेट्रो-३ प्रकल्पबाधितांसाठी काळबादेवी, गिरगाव हाइट्स

मेट्रो-३ प्रकल्पबाधितांसाठी काळबादेवी, गिरगाव हाइट्स

Next

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो-३ भुयारी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत गिरगाव आणि काळबादेवी येथे बाधित होत असलेल्या प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी प्राधिकरणाने आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार, भविष्यात काळबादेवी कमर्शियल सेंटर हे व्यावसायिक संकुल तर काळबादेवी हाइट्स आणि गिरगाव हाइट्स ही निवासी संकुले उभी राहणार आहेत.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने काळबादेवीला तीन टप्प्यांत विभागले आहे. त्यानुसार, के १, के २ आणि के ३ असे भाग करण्यात आले आहेत. के १ मध्ये पोखराज इमारत, छग्गुमल मेन्शन, इमारत क्रमांक ५९१, धरमसी आणि खान हाउस या परिसरातील ५ इमारती बाधित होत आहेत. यातील निवासी प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या ५३ तर अनिवासी प्रकल्पबाधितांची संख्या २५ आहे. ही संख्या एकूण ७८ आहे. के २ मध्ये चिरा बाझार, छत्रीवाला/काटावाला, अमृत निवास, फ्लॉवर मेन्शन, अलीम भवन, जैन भवन आणि हेम व्हिला या परिसरातील ७ इमारती बाधित होत आहेत. यातील निवासी प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या २७ तर अनिवासी प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या १२१ आहे. एकूण ही संख्या १४८ आहे. के ३ मध्ये कमानी वाडी येथील दोन इमारती बाधित होत आहे. येथील निवासी प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या ५ तर अनिवासी प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या १४ आहे. ही संख्या एकूण १९ आहे. गिरगावदेखील जी १, जी २ आणि जी ३ मध्ये विभागण्यात आले आहे. जी १ मध्ये विठ्ठलदास व्ही.आय.पी. लगेज येथील दोन इमारती बाधित होत आहेत. येथील प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या १८ तर अनिवासी प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या १० आहे. ही संख्या एकूण २८ आहे. जी २ मध्ये स्वामी निवास, श्री राम भुवन येथील दोन इमारती बाधित होत आहेत. निवासी प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या २० तर अनिवासी प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या १६ आहे. ही संख्या एकूण ३६ आहे. जी ३ मध्ये सूर्य महल आणि चंद्र महल प्लॉटवरील ७ इमारती, क्रांतीनगर आवारातील ४ इमारती, अन्नपूर्ण निवास या परिसरातील एकूण १२ इमारती बाधित होत आहेत. येथील निवासी प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या ३०० तर अनिवासी प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या १०३ आहे. ही संख्या एकूण ४११ आहे.

आवश्यक मंजुरीप्रमाणे बदल
के ३ म्हणजे काळबादेवी हाइट्स हा निवासी प्रकल्प असेल. ३८ मजल्यांची इमारत बांधण्यात येईल. तळमजल्यावर व्यावसायिक गाळे असतील. वन बीएचके, वन बीएचके लार्ज, १.५ बीएचके, थ्री बीएचके अशी एकूण ३०८ घरे या इमारतीमध्ये असतील. येथे यांत्रिक वाहन पार्किंग असेल. मनोरंजनासाठी टेरेस गार्डन असेल.

जी ३ म्हणजे गिरगाव हाइट्स ही ५० हून अधिक मजल्यांची पुनर्वसन इमारत असेल. यात शॉपिंग, व्यावसायिक संकुल, खालच्या मजल्यावर फूड कोर्ट, पोडीयम उद्यान, तळमजल्यावर बहुस्तरीय पार्किंगचा समावेश असेल. या इमारतीमध्ये वन बीएचके, टू बीएचके, टू बीचके लार्ज, थ्री बीएचके, फोर बीएचके, फोर बीएचके लार्ज अशी एकूण २४१ घरे असतील. दरम्यान, प्राधिकरणाकडून प्राप्त माहितीनुसार या आराखड्यांमध्ये आवश्यक मंजुरीप्रमाणे बदल होतील.

बांधकाम १८,६०० चौ.मी.
सर्व प्रकल्पबाधित व्यक्तींचे त्यांच्या श्रेणीनुसार के २, के ३ आणि जी ३ मध्ये पुनर्वसन केले जाईल. आराखड्यानुसार, के २ मध्ये व्यावसायिक प्रकल्पबाधित कुटुंबांसाठी पुनर्वसन इमारतींचे ३३ मजले असतील. ही इमारत संपूर्ण व्यावसायिक असेल. ‘काळबादेवी कमर्शियल सेंटर’ म्हणून इमारतीची ओळख असेल. एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे १८, ६०० चौरस मीटर असेल.

Web Title: Kalbadevi, Girgaum Highs for Metro-3 Projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो