‘गोपनीय’ पत्रावरून कलगीतुरा

By admin | Published: October 1, 2015 03:09 AM2015-10-01T03:09:16+5:302015-10-01T03:09:16+5:30

रस्त्यांच्या कामातही घोटाळा असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशा आशायाचे पत्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्त अजय मेहता यांना पाठविले

Kalgitra from 'Confidential' letter | ‘गोपनीय’ पत्रावरून कलगीतुरा

‘गोपनीय’ पत्रावरून कलगीतुरा

Next

मुंबई : रस्त्यांच्या कामातही घोटाळा असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशा आशायाचे पत्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्त अजय मेहता यांना पाठविले. सत्ताधाऱ्यांपैकीच एक असलेल्या महापौरांनी नालेसफाईत घोटाळा झाल्याचे मान्य करत रस्ते घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्याने आता सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत.
महापौरांनी पाठविलेल्या पत्रात कामाची ८०% रक्कम कंत्राटदारांच्या खिशात गेल्याचे म्हटले आहे. या पत्रावर ‘गोपनीय पत्र’ असा उल्लेख आहे. हे पत्र गोपनीय असेल तर ते बाहेर कसे आले, इथपासून आता राजकारण रंगले आहे. संबंधित पत्रावर महापौरांची स्वाक्षरी घेणाऱ्या त्यांच्या स्वीय सहायकाची बदली करण्यात आली आहे. महापौरांनी या पत्रावर स्वाक्षरी करताना पत्र का वाचले नाही आणि वाचले असेल तर मग स्वाक्षरी कशी केली, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर महापौरांकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)
रस्त्यांची कामे चांगली झाली आहेत यात वाद नाहीच. चौकशीची मागणी पक्षाने केलेली नाही तर महापौरांनी केली आहे. त्यामुळे ते महापौरांचे वैयक्तिक मत आहे. - यशोधर फणसे, अध्यक्ष, स्थायी समिती
------
विरोधी पक्षांच्या मागणीसह आता महापौरांनीच रस्ते घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्याने आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे.
- संदीप देशपांडे,
गटनेते, मनसे
रस्ते घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत महापौरांनी मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडले. याबद्दल त्यांचे अभिनंदन.
- देवेंद्र आंबेरकर, विरोधी पक्षनेते

Web Title: Kalgitra from 'Confidential' letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.