पात्र शाळांनाही अनुदान मिळालेले नाहीमुंबई : महानगरपालिका खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी सोमवारी आझाद मैदानात काळी दिवाळी साजरी केली. प्रलंबित मागण्यांसाठी धरणे देत शिक्षकांनी राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन केले.मुंबई महानगरपालिका खासगी प्राथमिक ४३ शाळांना अनुदान नसल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आल्याचे संघाचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर हांडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, पालिका आयुक्तांनी अनुदानाचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर वित्त मंत्र्यांच्या मंजूरीनंतर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्नही मार्गी लागेल.संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मनोहर कदम म्हणाले की अनुदानास पात्र शाळांना शासनाने अद्याप अनुदान निधी मंजूर केलेला नाही. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात निधी मंजूर करण्याची मागणीही कदम यांनी केली आहे. शिवाय शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
महापालिका खाजगी शिक्षकांची ‘काळी दिवाळी’
By admin | Published: November 10, 2015 2:26 AM