Join us

‘कालिदासा’ची भेट होणार ‘अपूर्व मेघदूता’शी; 15 जूनला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:10 AM

दाटून आलेल्या मेघांच्या सान्निध्यात मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात ‘अपूर्व मेघदूत’ सादर होण्याचा अपूर्व योग साधला जाणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात कालिदासाच्या ‘मेघदूत’वर आधारित या नाटकात १९ दृष्टिहीन कलाकारांची भूमिका हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

- अजय परचुरेमुंबई : दाटून आलेल्या मेघांच्या सान्निध्यात मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात ‘अपूर्व मेघदूत’ सादर होण्याचा अपूर्व योग साधला जाणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात कालिदासाच्या ‘मेघदूत’वर आधारित या नाटकात १९ दृष्टिहीन कलाकारांची भूमिका हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.गणेश दिघे या हरहुन्नरी लेखकाने ‘अपूर्व मेघदूत’या संगीत नाटकाची संहिता लिहिली आहे. १९९३ पासून जिवाचे रान करून दृष्टिहीनांसाठी काम करणाऱ्या स्वागत थोरात यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. यातील १९ कलाकार ही नाटकाची खरी जान आहे. आपल्यातील उणिवांवर मात करत या कलाकारांनी अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. नाटकात १२ ते १३ गाणी असून त्यासह हे नाटक रंगमंचावर घेऊन येणे हे सोपे काम नव्हते. मात्र यातील सर्व कलाकारांनी मोठ्या जिद्दीने हे लक्ष्य लीलया गाठले. त्यांच्या या अनोख्या आविष्काराला मोठे व्यासपीठ मिळावे, या हेतूने मराठी नाट्य परिषदेने ‘अपूर्व मेघदूत’ला नाट्य संमेलनाच्या ६० तासांच्या नाट्ययज्ञात संधी दिली आहे.वीणा ढोले आणि रश्मी पांढरे यांनी या नाटकाची निर्मिती केली असून, १५ जूनला या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. आयोजनापासून आविष्कारापर्यंत वेगळेपण जपणाºया संमेलनातील हे सादरीकरण नेत्रदीपक ठरणार आहे.योगायोगाची गोष्ट म्हणजे २००१ साली स्वागत थोरात यांनी ४४ दृष्टिहीन कलाकारांना घेऊन पु. ल. देशपांडे यांच्या ‘तीन पैशांचा तमाशा’चा प्रयोग वसईच्या नाट्य संमेलनात केला होता.संधी हाच सुखद धक्काआम्हाला नाट्य संमेलनात प्रयोग सादर करण्याची संधी मिळते आहे, हीच मला सुखद धक्का देणारी गोष्ट आहे. इतक्या मोठ्या व्यासपीठावर प्रयोग करण्याच्या कल्पनेनेच आमचे सर्व कलाकार आनंदित झाले आहेत. आमच्यासारख्या प्रामाणिकपणे रंगभूमीची सेवा करणाºया रंगकर्मींना संधी देणे, ही नाट्य परिषदेमधील बदललेल्या वाºयाची झुळूक आहे, एवढे नक्की.- स्वागत थोरात, दिग्दर्शक, अपूर्व मेघदूत

टॅग्स :मुंबई