३९ वर्षांपासून प्रसिद्ध आहे शिवाजी पार्कजवळील बंगाल क्लबचे कालीमाता मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 02:41 AM2017-09-24T02:41:19+5:302017-09-24T02:41:29+5:30

शिवाजी पार्कजवळील बंगाल क्लबचे कालीमाता मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. ज्या ठिकाणी मंदिर बांधले आहे, तेथे स्थानिक बंगाली सामुदाय ८२ वर्षांपासून दुर्गापूजा आणि नवरात्रौत्सव साजरा करत आहे.

Kalimata Temple of Bengal Club near Shivaji Park is famous for 39 years | ३९ वर्षांपासून प्रसिद्ध आहे शिवाजी पार्कजवळील बंगाल क्लबचे कालीमाता मंदिर

३९ वर्षांपासून प्रसिद्ध आहे शिवाजी पार्कजवळील बंगाल क्लबचे कालीमाता मंदिर

googlenewsNext

- अक्षय चोरगे ।

मुंबई : शिवाजी पार्कजवळील बंगाल क्लबचे कालीमाता मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. ज्या ठिकाणी मंदिर बांधले आहे, तेथे स्थानिक बंगाली सामुदाय ८२ वर्षांपासून दुर्गापूजा आणि नवरात्रौत्सव साजरा करत आहे. १९७८ साली काली मातेचे छोटे मंदिर उभारले. मंदिराची ख्याती दिवसेंदिवस वाढू लागली. मुंबईसह परराज्यातून भाविक मातेच्या दर्शनासाठी येऊ लागल्याने, १९९४ साली मोठे मंदिर उभारण्यात आले.
३९ वर्षांपूर्वी कोलकाता येथून गंगेच्या किनाºयावरील मातीपासून तयार केलेली कालीमातेची मूर्ती मुंबईत आणली. संपूर्णपणे ईको फ्रेंडली अशी मूर्ती बंगाली मूर्तिकारांनी तयार केलेली आहे. नवरात्रौत्सवातही गंगेच्या किनाºयावरून आणलेल्या मातीपासूनच दुर्गेची मूर्ती बंगाली मूर्तिकार तयार करतात. पुरातन आणि पारंपरिक बंगाली पद्धतीने येथे दुर्गापूजा केली जाते. नवरात्रौत्सवात पंचमीपासून दसºयापर्यंत दहा लाखांहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. प्रत्येक पौर्णिमेला येथे सत्यनारायणाची पूजा केली जाते. शेकडो भाविक प्रत्येक पौर्णिमेला पूजेसाठी आणि कालीमातेच्या दर्शनासाठी येतात. नवरात्रौत्सवात पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने येतात. कुमारी पूजन हा मोठा सोहळासुद्धा मंदिरात साजरा केला जातो.
येथे नवरात्रौत्सवासह हनुमान जयंती, साईबाबा जयंती आणि शिवरात्री साजरी केली जाते. हे सणही बंगाली पद्धतीनेच साजरे केले जातात. या वेळी लाखो लोक या सोहळ्यांमध्ये सामील होतात, असे बंगाल क्लबचे सरचिटणीस बिबेक बाग्ची यांनी सांगितले.

Web Title: Kalimata Temple of Bengal Club near Shivaji Park is famous for 39 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.