Join us  

कळवा-मुंब्य्रात आघाडीचाच ङोंडा?

By admin | Published: June 21, 2014 10:45 PM

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रथमच अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघाची आमदारकी भूषविण्याचा मान राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी पटकावला.

नंदकुमार टेणी - ठाणो
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रथमच अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघाची आमदारकी भूषविण्याचा मान राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी पटकावला. अलीकडेच त्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद मिळाल्याने ठाणो महानगराचे पहिले कॅबिनेट मंत्री होण्याचा किताबही त्यांनी पटकावला. कल्याण लोकसभा मतदारसंघात येणा:या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ याच मतदारसंघात आघाडीचे पराभूत उमेदवार आनंद परांजपे यांना आघाडी घेता आली होती. त्यामुळेच आव्हाड यांना पहिल्याच आमदारकीत कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी लागली. 2क्क्9च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात 2,68,827 मतदार होते. त्यापैकी 1,32,क्73 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी राष्ट्रवादीच्या आव्हाड यांनी 65,51क् मते मिळवून विजय प्राप्त केला होता. त्यांनी शिवसेनेच्या राजन किणो यांचा पराभव केला. किणो यांना 45,821 मते मिळाली होती. आव्हाडांचे मताधिक्य 19,889 एवढे होते. अर्थात आव्हाडांचा हा विजय मनसेच्या प्रशांत बाळकृष्ण पवार यांनी 15,119 मते खाल्ल्यामुळे घडून आला होता. तसेच समाजवादी पक्षाचे सुरमे यांनी 3,429 तर बसपाच्या सचिन म्हात्रे यांनी 2,756 मते गिळंकृत करून आव्हाडांच्या विजयाला हातभार लावला होता. या मतदारसंघात 16 उमेदवार होते त्यापैकी 14 जणांची अनामत रक्कम जमा झाली होती. या पाश्र्वभूमीवर या मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा कौल पाहिला तर येथे राष्ट्रवादीची आव्हाडकी कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना 65,16क् मते मिळाली ती गेल्या विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांना मिळालेल्या मतांपेक्षा 3,65क्ने जास्त आहेत. म्हणजेच आघाडीची मते इथे वाढली आहेत तसेच लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या श्रीकांत शिंदे यांना या विधानसभा मतदारसंघात 52,9क्4 मते मिळाली. तर पराभूत झालेले आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना 65,16क् मते मिळाली; म्हणजे पराभव झाला असला तरी लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारापेक्षा 12,256 मते अधिक मिळाली आहेत. त्यात आता आव्हाडांच्या मंत्रिपदाची भर पडली आहे. शिवाय ते राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष पदही भूषवित आहेत. हे पाहता या विधानसभा निवडणुकीत आघाडीकडून त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. तर शिवसेनेच्या वतीने सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा आहे. मनसेच्या वतीने संघटनेतच फारसे महत्त्वपूर्ण नसलेल्या मनोहर सुखदरे यांची चर्चा आहे. मागच्या वेळी शिवसेनेकडून उमेदवारी करणारे व पराभूत झालेले किणो आता काँग्रेसवासी झालेले आहेत. या सगळ्या घटना एकीकडे व लोकसभा निवडणुकीत असलेली मोदी लाट विधानसभा निवडणुकीत कायम राहण्याची शक्यता दुसरीकडे अशा दोन परस्परविरोधी बाबी पाहिल्या तर सध्याची परिस्थिती या मतदारसंघात पुन्हा एकदा आघाडीचे आव्हाडच जितेंद्र ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.