Join us  

'कल्याण लोकसभा बाप की जायदाद असं काहींना वाटतं; उद्धव ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 2:53 PM

दोन दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेवर निकाल दिला.

मुंबई-  दोन दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेवर निकाल दिला. यात त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिलासा दिला, यावरुन आता दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कल्याण दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. 'कल्याण लोकसभा बाप की जायदाद असं काहींना वाटतं होतं, यांच्या घराणेशाहीला दिलेली उमेदवारी ही चूक माझी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केली. 

कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, महाराष्ट्रभर आरत्या करा, आनंद साजरा करा; राज ठाकरेंचं आवाहन

"बोलण्यासारखे खूप आहे, २३ जानेवारी मी खूप बोलणार आहे. आज मला बरं वाटलं, काहींना कल्याण लोकसभा बाप की जायदाद आहे असं वाटतं होतं. त्यावेळी मी निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारुन यांना उमेदवारी दिली होती. पण, यावेळी मी ती चूक दुरुस्त करणार आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

"आपल्यासोबत सगळे आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, वंचित हे सगळे सोबत आहे. उद्या संक्रांत आहे संक्रांतीला आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतो हे कालपासून सुरू झाले आहे. निवडणुकीला महाराष्ट्र लागतो आणि व्यवसायाला गुजरात लागतो, आता महाराष्ट्राची ताकद दाखवूया, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

'पक्ष कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही'

विधानसभा अध्यक्षांनी दिलेला कालचा निकाल हा लोकशाहीला अनुसरून आहे, पक्ष ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार यांना घेऊन पक्ष पुढे जात असतो. काल निकाल जाहीर झाल्यानंतर काही लोकांना त्याचा त्रास झाला आहे. त्यामुळे ते निकालावर विरोधात प्रतिक्रिया देत आहे, असे मत  खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. 

खासदार शिंदे म्हणाले,  कालचा निकाल विरोधात गेला म्हणून उद्धव ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना हा निकाल झोंबला आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्या पर्यंत त्यांना केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच दिसतात गेल्या दीड वर्षापासून राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत.

टॅग्स :उद्धव ठाकरेश्रीकांत शिंदेशिवसेना