डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक स. ११.१५ ते दु. ३.१५ या वेळेत असेल. ब्लॉकच्या कालावधीत अप जलदवर गाड्या वळवण्यात येणार आहेत.त्यामुळे त्या कालावधीत ठाकुर्ली, कोपर, दिवा, कळवा, मुंब्रा आदी स्थानकांतील अपच्या फलाटांवर लोकल धावणार नाहीत. प्रवाशांना ठाणे-डोंबिवली स्थानकांतून आहे त्या तिकीट-पासावर प्रवासाची मुभा दिल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.वाशी-बेलापूर मार्गावर ट्रॅफिकब्लॉकवाशी-बेलापूर मार्गावर रविवारी पहाटे २ ते स. १० वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी-वाशी-सीएसटी तसेच पनवेल-बेलापूर-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ट्रान्स-हार्बरच्या ठाणे-वाशी तसेच नेरूळ मार्गावरील लोकल वेळापत्रकानुसारच धावतील, असेही जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. हा ट्रॅफिकब्लॉक (कनेक्टिंग लेड अप अॅण्ड डाऊन) विशिष्ट तांत्रिक कामासाठी घेण्यात येत आहे.
कल्याण-ठाणे मेगाब्लॉक
By admin | Published: February 07, 2016 2:17 AM