कल्याण ते टिटवाळा रात्रकालीन ब्लॉक; गर्डर टाकण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 01:59 AM2020-03-12T01:59:24+5:302020-03-12T01:59:43+5:30
१३ लोकल्ससह अनेक एक्स्प्रेस रद्द
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते टिटवाळा या दरम्यान शुक्रवार-शनिवार, शनिवार-रविवार रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या दरम्यान टिटवाळा पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते कसारादरम्यान दोन्ही दिशांकडील मार्गावरील विशेष ब्लॉक घेतला जाईल. या दरम्यान अनेक लोकल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
शनिवारी, १४ मार्च रोजी रात्री २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत, तर १४ मार्चच्या रात्री ११.५० ते १५ मार्च रोजी रात्री ३.५० पर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकमध्ये एकूण १३ लोकल रद्द केल्या जातील, तर अनेक एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. प्रवाशांनी रद्द करण्यात आलेल्या लोकल व एक्स्प्रेसची माहिती घेऊन त्यानुसारच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
शुक्रवारी रात्री ११.५१ची लोकल रद्द
सीएसएमटी-टिटवाळा लोकल नाही
१३ मार्च रोजी रात्री ११.५१ची सीएसएमटी-टिटवाळा लोकल रद्द करण्यात येईल.
१४ मार्च रोजी या लोकल रद्द
पहाटे ४.१५ सीएसएमटी-कसारा, पहाटे ४.३२ टिटवाळा-सीएसएमटी, पहाटे ४.५१ विद्याविहार-टिटवाळा, पहाटे ५.१२ विद्याविहार-टिटवाळा, पहाटे ५.२८ कल्याण-आसनगाव, पहाटे ५.३५ टिटवाळा-सीएसएमटी, रात्री ८.२१ टिटवाळा-सीएसएमटी, रात्री ९ टिटवाळा-सीएसएमटी, रात्री १० सीएसएमटी-टिटवाळा, रात्री १०.०६ टिटवाळा-सीएसएमटी, रात्री १०.५१ सीएसएमटी-टिटवाळा, रात्री ११.४४ सीएसएमटी-टिटवाळा.
१३ मार्च रोजी या एक्स्प्रेस रद्द
नांदेड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस, अमरावती-सीएसएमटी, नागपूर-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस, भुसावल-सीएसएमटी पॅसेंजर,
१४ मार्च रोजी या एक्स्प्रेस रद्द
मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-अमरावती, सीएसएमटी-नागपूर नंदीग्राम, सीएसएमटी-भुसावल पॅसेंजर, एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस