कमला मिल परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 09:01 AM2018-12-29T09:01:50+5:302018-12-29T09:03:21+5:30

मुंबईत गेल्या महिनाभरापासून आगीचे सत्र सुरू असून, त्यात आता चेंबूरनंतर पुन्हा एकदा कमला मिल परिसराची भर पडली आहे.

In the Kamala Mill area, five fire engines and fire brigade were admitted to the building | कमला मिल परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल

कमला मिल परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल

मुंबई - चेंबूरच्या टिळकनगरमधील इमारतीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी लोअर परळ परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीला आग लागली. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सकाळी 7.30 च्या सुमारास ही आग लागली. दरम्यान, यापूर्वीही कमला मिल परिसरात अग्नितांडव घडले होते. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईत गेल्या महिनाभरापासून आगीचे सत्र सुरू असून, त्यात आता चेंबूरनंतर पुन्हा एकदा कमला मिल परिसराची भर पडली आहे. येथील निर्माणधीन इमारतीलाच्या मजल्यावर आग लागल्याची घटना सकाळी घडली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान 5 आगीचे बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत. 


दरम्यान, टिळकनगरमधील म्हाडाच्या 35 क्रमांक इमारतीतील 11 व्या मजल्यावरील 1101 मध्ये राहणाऱ्या मेघपुरीया या ख्रिश्चन कुटुंबीयांमध्ये गतिमंद मुलगा, वडील आणि पत्नी घरात राहत होते. 24 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्यासाठी त्यांच्या घरात ख्रिसमस ट्री सजविण्यात आला होता. त्याला लायटिंगही केली होती. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या घरातून जळाल्याचा वास येत होता. बेडरूममधील ख्रिसमस ट्रीला शॉर्ट सर्किटने आग लागली होती. बेडरूममधील मुलासह पत्नीला मेघपुरीया यांनी घराबाहेर आणत आरडाओरड केली. समोरच राहणाºया गंजर कुटुंबीयांच्या घराची बेल वाजवली. पुढे त्यांनी खालच्या मजल्यावरील 1001 मध्ये राहणारे सोसायटीचे सदस्य शंकर लंके यांनाही सांगितले. त्यानुसार त्यांनी अग्निशमन दलाला फोन केला आणि वरील सर्व मजल्यांवरील रहिवाशांना शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती देण्यासाठी ते गेले. मात्र, तोपर्यंत ट्रीवरील पडद्यांनी पेट घेतला. काही वेळातच खाली असलेल्या सोफ्याने पेट घेतला आणि क्षणार्धात आग संपूर्ण घरभर पसरली.
 

Web Title: In the Kamala Mill area, five fire engines and fire brigade were admitted to the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.