Kamala Mills fire : मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 02:28 PM2018-01-07T14:28:31+5:302018-01-07T14:28:56+5:30
कमला मिल अग्निकांडाप्रकरणी अटक करण्यात आलेला मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठक याची 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रात्री उशिरा अटक करण्यात आलेल्या युग याला आज भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले.
Next
मुंबई - कमला मिल अग्निकांडाप्रकरणी अटक करण्यात आलेला मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठक याची 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रात्री उशिरा अटक करण्यात आलेल्या युग याला आज भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
#KamalaMillsFire : Yug Pathak, one of the owners of Mojo's Bistro sent to police custody till January 12 by Bhoiwada court #Mumbai
— ANI (@ANI) January 7, 2018
कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी मोजो बिस्ट्रो पबचे मालक युग पाठक आणि युग तुली यांच्यासोबतच एका मॅनेजरविरोधात ना. म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला काल रात्री अटक करण्यात आली.
14 जणांचा गुदमरुन मृत्यू
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ११ तरुणींसह १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री (28 डिसेंबर 2017 ची घटना) ही दुर्घटना घडली. इमारतीतील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवामध्ये २४ महिलांसह ५४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पबमालक अभिजित मानकर, रितेश संघवी, जिगर संघवी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेतले आहे. तर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिकेच्या पाच अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
मृतांची नावे :
प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली दोषी, पारुल, खुशबू मेहता-बन्सल, मनीषा शहा, प्राची खेतान, यशा ठक्कर, सरबजीत परीदा, धैर्य ललानी, विश्व ललानी