Kamala Mills fire : कुठल्याही दबावाशिवाय अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, उद्धव ठाकरेंचा आयुक्तांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 01:58 PM2018-01-06T13:58:47+5:302018-01-06T14:02:41+5:30
‘कोणत्याही बड्या नेत्याचा दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करावी.’ असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयुक्तांना दिला आहे.
मुंबई - ‘कोणत्याही बड्या नेत्याचा दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करावी.’ असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयुक्तांना दिला आहे. शनिवारी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी कारवाई थांबविण्यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा गौप्यस्फोट मनपा आयुक्तांनी केला होता. आगीच्या दुर्घटनेनंतर कमला मिलमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली. मात्र ही कारवाई करताना एका राजकीय नेत्याने आपल्यावर दबाव आणल्याचे आयुक्तांनी सभागृहात सांगितले.
मात्र मी ऐकणार सगळ्यांचे पण काम करणार कायद्याप्रमाणेच हेच माझे तत्त्व आहे. म्हणूनच तिथे 17 बेकायदा बांधकामं मी पाडली आणि ही कारवाई अशीच सुरू राहणार, मी मागे हटणार नाही, असे सांगितले. मात्र त्या नेत्याचे नाव जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.
यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आयुक्तांनी कोणाचाही दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. शिवसेना त्यांच्या सोबत असेल. फक्त बांधकाम अधिकृत आहे का अनधिकृत याची खातरजमा करावी.'
दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपाला टोलादेखील हाणला. ‘कमला मिल प्रकरणात पब चालकांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करावं लागतं हा म्हणजे कहरच झाला. इनाम लावायला ते दहशतवादी आहेत का?, जर पबचे मालक अद्याप सापडत नसतील तर पोलीस खातं नेमकं काय करतंय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
It has been days since #KamlaMillsFire incident but no arrest has been made till now, we need to see if there is any political pressure on the government (of Maharashtra) to not take action against the accused: Shiv Sena Chief Uddhav Thackeray pic.twitter.com/IsAsCzyQbo
— ANI (@ANI) January 6, 2018