मुंबई : जवळची मैत्रीण असलेल्या खुशबू भन्साळी हिच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या गिरगाव खेतवाडी येथील किंजल मेहता (२८) हिचा लोअर परळ येथील रेस्टॉरंटमध्ये गुदमरून मृत्यू झाला. ‘मी अडकलेय, मला वाचवा..’ असा कॉल तिने पतीला केलाही होता. मात्र तोच कॉल शेवटचा ठरला. या आगीत किंजल आणि खुशबू या जिवाभावाच्या मैत्रिणींना आपले प्राण गमवावे लागले.आग लागल्याचे कळताच सर्वांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी प्राण वाचविण्यासाठी धावाधाव केली, त्याच वेळेस चेंगराचेंगरी झाल्याने एकत्र असलेले किंजल आणि तिचे पती एकमेकांपासून वेगळे झाले. किंजल दुरावल्याचे वेळीच लक्षात न आल्याने तिच्या पतीने बाहेर येण्याचा मार्ग पत्करला. अखेरीस १०-१५ पायºया उतरल्यानंतर किंजल नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पुन्हा रेस्टॉरंटमध्ये धाव घेतली. पुन्हा रेस्टॉरंटमध्ये धाव घेतानाच किंजलच्या पतीने ६-७ जणांचे प्राण वाचविले. त्या वेळेस किंजलने शौचालयात अडकल्याचा फोन पतीला केला. मात्र त्या वेळेस त्या ठिकाणी आग भडकली होती. प्रचंड धुराचे लोट येत होते. त्यातच गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचे तिच्या कुुटुंबीयांनी सांगितले.- किंजल मेहता
#KamalaMillsFire: मदतीसाठी केलेला तो कॉल ठरला अखेरचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 2:23 AM