#KamalaMillsFire : कमला मिल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 06:57 PM2017-12-29T18:57:55+5:302017-12-29T18:59:32+5:30

मुंबईच्या कमला मिल परिसरातील हॉटेलला आग लागून झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींबद्दल संवेदना व्यक्त करतानाच महानगरपालिका आणि राज्य सरकारमधील भ्रष्ट अधिकार्‍यांच्या कारभारामुळेच अशा घटना वारंवार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

#KamalaMillsFire: Take Kamalay Mill Accident Judicial Inquiry - Dhananjay Munde | #KamalaMillsFire : कमला मिल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा - धनंजय मुंडे

#KamalaMillsFire : कमला मिल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा - धनंजय मुंडे

googlenewsNext

मुंबई : मुंबईच्या कमला मिल परिसरातील हॉटेलला आग लागून झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींबद्दल संवेदना व्यक्त करतानाच महानगरपालिका आणि राज्य सरकारमधील भ्रष्ट अधिकार्‍यांच्या कारभारामुळेच अशा घटना वारंवार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

कमला मिल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे आहेत. फायरच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले  जात आहे. विना परवानगी ग्राहकांकडुन पार्किंगची मोठ्या प्रमाणात वसुली केली जात आहे. याबाबत मी महानगर पालिका आणि शासनाकडे वारंवार तक्रारी करून त्याची दखल घेतल्या गेली नाही. आपण केलेल्या सर्व तक्रारींचे आपल्याकडे पुरावे ही आहेत. मात्र महानगरपालिका आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आशिर्वादामुळेच अशा नियमबाह्य कामांकडे दुर्लक्ष होऊन अशा घटना घडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईत नाईट लाईफ सुरू करू इच्छिणार्‍या सत्ताधार्‍यांना मुंबईकरांचे जीवन त्यांच्या ताब्यातील भ्रष्ट संस्थांमुळे किती धोकादायक आहे याची प्रचिती कमला मिलच्या दुर्घटनेमुळे आली असेल असे ही त्यांनी म्हटले आहे. राज्यात एकाच महिन्यात अशा प्रकारच्या तीन दुर्घटना घडल्या.

कमला मिल आणि साकीनाका येथील भानु फरसान शॉप मधील घटने प्रकरणी मालकांवर तातडीने गुन्हा दाखल झाला मात्र 20 दिवस उलटुनही अशा दुर्घटनेत सात कामगार मयत झालेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर साधा एफआयआर ही का दाखल झाला नाही, असा सवाल उपस्थित करतांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याला पाठीशी घालत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील अनाधिकृत हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लर, डान्स बार यामधुन कोट्यावधी रूपयांचा हप्ता सरकारला मिळत असून, त्यातुनच निवडणुकांचा खर्च भागवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

Web Title: #KamalaMillsFire: Take Kamalay Mill Accident Judicial Inquiry - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.