कंबाला हिल रुग्णालय पुन्हा रुग्णसेवेत, दोन वर्षांनंतर कार्यान्वित होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 01:47 AM2019-09-19T01:47:03+5:302019-09-19T01:47:09+5:30

दोन वर्षे सेवा खंडित झाल्यानंतर अखेर केम्प्स कॉर्नर येथील कंबाला हिल रुग्णालयाने पुन्हा गरजू रुग्णांसाठी दारे उघडली आहेत.

Kambala Hill Hospital will be operational again after two years in patient care | कंबाला हिल रुग्णालय पुन्हा रुग्णसेवेत, दोन वर्षांनंतर कार्यान्वित होणार

कंबाला हिल रुग्णालय पुन्हा रुग्णसेवेत, दोन वर्षांनंतर कार्यान्वित होणार

Next

मुंबई : दोन वर्षे सेवा खंडित झाल्यानंतर अखेर केम्प्स कॉर्नर येथील कंबाला हिल रुग्णालयाने पुन्हा गरजू रुग्णांसाठी दारे उघडली आहेत. केम्प्स कॉर्नरजवळील ६० खाटांची क्षमता असलेले मल्टि-स्पेशालिटी रुग्णालय एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापनाद्वारे चालविले जाणार आहे.
एसीआय कंबाला हिल रुग्णालय सुमारे २२ हजार चौरस फूट जागेत पसरलेले आहे. यामध्ये अतिदक्षता विभागात ११ खाटा असून चार शस्त्रक्रिया दालने आहेत. या रुग्णालयामध्ये कॅन्सरवरील अनेकविध स्पेशॅलिटी उपचारांसह जनरल डायग्नोस्टिक रेडिओलॉजी, पेडिअ‍ॅट्रिक हेल्थकेअर, युरोलॉजी, आॅर्थोपेडिक्स, ह्युमॅटोलॉजी आणि अन्य अनेक वैद्यकीय शाखांद्वारे उपचार केले जातात. याशिवाय, या रुग्णालयात लेसर शस्त्रक्रिया तसेच संपूर्ण एण्डोस्कोपी सुईट आणि रोबोटिक्सचा समावेश असलेल्या मिनिमली इन्व्हेजिव्ह शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत.
हे रुग्णालय बंद होण्यापूर्वी येथे कन्सल्टंट म्हणून काम करणारे प्रख्यात आॅन्कोलॉजिस्ट डॉ. रमाकांत देशपांडे नवीन एसीआय व्यवस्थापनाचाही भाग आहेत. पूर्णपणे नवा चेहरा, उपकरणे व उत्तम कन्सल्टंट पॅनल असलेले व्यवस्थापन यामुळे लोकांना लाभ होईल आणि हे सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दोन वर्षांच्या कालावधीनंतर हे रुग्णालय आता पूर्वीचे ज्येष्ठ डॉक्टर्स व नवीन डॉक्टरांच्या पथकासह पूर्ण जोमाने काम करणार याचा मला आनंद वाटत आहे. सर्वोत्तम सेवा व सुविधा देण्यासाठी हे रुग्णालय समर्पितपणे काम करत आहे. डॉ. देशपांडे म्हणाले, पुन्हा सुरू झालेले रुग्णालय विशेष आरोग्यसेवा पुरवेल आणि रुग्णालयाचा भर महत्त्वाच्या स्पेशॅलिटीज व एसीआयमधील डॉक्टरांच्या खास पथकाचा समावेश असलेले सुसंघटित कर्करोग उपचार केंद्र यावर असेल.
>कर्करोग उपचार केंद्र असणार
डॉ. देशपांडे म्हणाले, पुन्हा सुरू झालेले रुग्णालय विशेष आरोग्यसेवा पुरवेल आणि रुग्णालयाचा भर महत्त्वाच्या स्पेशॅलिटीज व एसीआयमधील डॉक्टरांच्या खास पथकाचा समावेश असलेले सुसंघटित कर्करोग उपचार केंद्र यावर असेल.

Web Title: Kambala Hill Hospital will be operational again after two years in patient care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.