Join us

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांना 1 वर्षाच्या कैदेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 6:00 AM

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्यासह 17 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे

मुंबई - शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्यासह 17 जणांना  मुंबई सत्र न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2014 च्या लोकसभा  निवडणुकीत शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामध्ये एक पोलीस शिपाई जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात कामिनी शेवाळे यांच्यासह 17 जणांविरोधात खटला दाखल केला होता. या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी करण्यात आली. न्यायालयाने तुर्तास त्यांना जामीन मंजूर केला आहे. 

साल 2014 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान तुर्भे येथे पैसे वाटल्याच्या आरोपावरुन  मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पुढे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत त्याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी विकास थोरबोले जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात कामिनी यांच्यासह अन्य 17 जणांवर आयपीसी कलम 149 आणि 427 यानुसार मारहाण, हत्येचा प्रयत्न आणि जमावबंदीचा आरोप दाखल केला होता.

दरम्यान सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तसेच मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश डी के गुदाधे यांनी मंगळवारी हत्येचा प्रयत्न या आरोपातून सर्व आरोपींची सुटका केली. 

टॅग्स :शिवसेनाराहुल शेवाळेन्यायालयमनसे