कमला मिल अग्नितांडव : न्यायालयाने पाच आरोपींचा जामीन नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 08:46 PM2018-01-25T20:46:11+5:302018-01-25T21:11:27+5:30
कमला मिल अग्नितांडव प्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी भोईवाडा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
मुंबई - कमला मिल अग्नितांडवप्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी भोईवाडा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
लोअर परेल येथील मोजो बिस्टो आणि वन अबव्ह या पबनां लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी वन अबव्ह रेस्टो पबचे तीन मालक जीगर संघवी, कृपेश संघवी आणि अभिजीत मानकर यांना आणि मोजो बिस्टो पबचे मालक युग पाठक आणि युग टुली यांना अटक करण्यात आली होती. तसेच यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.
दुर्घटनेत 14 जणांचा झाला होता गुदमरुन मृत्यू
मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ११ तरुणींसह १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री (28 डिसेंबर 2017 ची घटना) ही दुर्घटना घडली. इमारतीतील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवामध्ये २४ महिलांसह ५४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पबमालक अभिजित मानकर, रितेश संघवी, जिगर संघवी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेतले आहे. तर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिकेच्या पाच अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
मृतांची नावे :
प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली दोषी, पारुल, खुशबू मेहता-बन्सल, मनीषा शहा, प्राची खेतान, यशा ठक्कर, सरबजीत परीदा, धैर्य ललानी, विश्व ललानी