Join us

कमला मील अग्निकांड : विशाल कारिया याला जामीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 10:33 PM

कमला मील अग्निकांड प्रकरणी अटक करण्यात आलेला एक आरोपी विशाल कारिया याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील भोईवाडा येथील न्यायालयाने विशाल कारिया याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. 

मुंबई - कमला मील अग्निकांड प्रकरणी अटक करण्यात आलेला एक आरोपी विशाल कारिया याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील भोईवाडा येथील न्यायालयाने विशाल कारिया याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.  कमला मील अग्निकांड प्रकरणी  हॉटेल व्यावसायिक विशाल कारियाला मंगळवारी (9 जानेवारी) पोलिसांनी अटक केली होती. 'वन अबव्ह'च्या मालकांना पोलिसांपासून वाचवण्याचा आणि स्वत:च्या घरात आसरा देण्याचा आरोप त्याच्यावर आहे. विशाल करियाकडूनच पसार असलेला आरोपी अभिजीत मानकरची कारही जप्त करण्यात आली होती. 14 जणांचा गुदमरुन मृत्यू   लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ११ तरुणींसह १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री (28 डिसेंबर 2017 ची घटना) ही दुर्घटना घडली. इमारतीतील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवामध्ये २४ महिलांसह ५४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पबमालक अभिजित मानकर, रितेश संघवी, जिगर संघवी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेतले आहे. तर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिकेच्या पाच अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.  मृतांची नावे :प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली दोषी, पारुल, खुशबू मेहता-बन्सल, मनीषा शहा, प्राची खेतान, यशा ठक्कर, सरबजीत परीदा, धैर्य ललानी, विश्व ललानी  

टॅग्स :न्यायालयकमला मिल अग्नितांडवगुन्हा