कमला मिल आग : अग्निशमन अधिका-यासह तिघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:24 AM2018-01-22T04:24:03+5:302018-01-22T04:24:53+5:30

कमला मिल येथील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिका-यासह तिघांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

Kamla Mill Fire: Fire Service Officer, along with three police constables | कमला मिल आग : अग्निशमन अधिका-यासह तिघांना पोलीस कोठडी

कमला मिल आग : अग्निशमन अधिका-यासह तिघांना पोलीस कोठडी

Next

मुंबई : कमला मिल येथील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिका-यासह तिघांना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. कमला मिलचा संचालक रवी सूरजमल भंडारी, अग्निशमन अधिकारी राजेंद्र
बबन पाटील व हुक्का पार्लरचा पुरवठादार उत्कर्ष विनोद पांडे अशी त्यांची नावे असून, या प्रकरणी आणखी काही अधिकाºयांना लवकर अटक केले जाणार आहे.
कमला मिलमधील दुर्घटना हुक्का पार्लरमधील भडक्यामुळे लागल्याचा अहवाल नुकताच महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. त्यानंतर, पोलिसांच्या कारवाईने वेग घेतला आहे.
अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील याने कमला मिलमधील हॉटेल व पबमधील अग्निसुरक्षेबाबत पुरेशी व्यवस्था असल्याचा खोटा अहवाल दिला होता. त्यामुळे त्यालाही या प्रकरणात जबाबदार धरण्यात आले असून, त्याच्यासह कमला मिलचा भागीदार भंडारी व हुक्का पार्लरसाठी पुरवठा करणा-या पांडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, २५ जानेवारीपर्यंत कोठडी मिळाली.
१३ अधिकारी टार्गेटवर-
दुर्घटनेला महापालिकेचे २ वॉर्ड अधिकारी, आरोग्याधिकारी व अग्निशमन दलातील १० अधिकारी जबाबदार आहेत, असे मुुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुुळे त्यांच्यावर कधी कारवाईचा बडगा उगारला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Kamla Mill Fire: Fire Service Officer, along with three police constables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.