Join us

कमला मिल आग : पालिका प्रशासन तीन महिन्यांत अहवाल सादर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 4:50 AM

कमला मिल कम्पाउंडमध्ये विकास नियंत्रण नियमावली व माहिती तंत्रज्ञान धोरणाचा गैरवापर, एफआयएस घोटाळा केल्याचे चौकशीतून उजेडात आले.

मुंबई : कमला मिल कम्पाउंडमध्ये विकास नियंत्रण नियमावली व माहिती तंत्रज्ञान धोरणाचा गैरवापर, एफआयएस घोटाळा केल्याचे चौकशीतून उजेडात आले. आगीच्या भक्षस्थानी पडलेले मोजो बिस्टो, वन अबव्ह रेस्टो पबही याच मिल परिसरात आहेत. या घोटाळ्याच्या सविस्तर सर्वेक्षण, विश्लेषणाची गरज आहे. हे सर्वेक्षण येत्या तीन महिन्यांत पूर्ण करून अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. या मिल परिसरात अग्निशमन नियमांबरोबरच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) घोटाळाही या चौकशीतून समोर आला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार कमला मिल परिसराला मंजूर एफएसआय अधिक १.३३ अतिरिक्त एफएसआय मंजूर केला होता. माहिती तंत्रज्ञान व त्याच्याशी निगडित व्यवसायासाठी या जागेचा वापर केल्यास व्यावसायिक वापरासाठी २० टक्के एफएसआय देण्यात येतो. मात्र कमला मिलमध्ये या नियमांचे उल्लंघन झाले. या घोटाळ्याची शहानिशा करण्याची शिफारस नुकत्याच सादर केलेल्या अहवालात पालिका आयुक्त अजय मेहता यांनी केली आहे.संघवी बंधू, मानकरविरुद्धआणखी एक गुन्हाकमला मिल आगप्रकरणातील आरोपी जिगर संघवी, क्रिपेश संघवी, अभिजित मानकरवर शुक्रवारी आणखी एक गुन्हा दाखल झाला. ८ लाख ६५ हजारांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. कमला मिलप्रकरणी वन अबव्हचे संचालक संघवी बंधू, मानकरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असून तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडव