Join us

Kamala Mills Fire: कमला मिलच्या मालकांचा जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 12:02 IST

कमला मिल आग प्रकरणी कमला मिलचे मालक रमेश गोवानी व रवी भांडारी यांची उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुंबई : कमला मिल आग प्रकरणी कमला मिलचे मालक रमेश गोवानी व रवी भांडारी यांची उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.२९ डिसेंबर २०१७ रोजी कमला मिलला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी या मिलचे मालक रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांना पोलिसांनी अटक केली. दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला. उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुटीकालीन खंडपीठापुढे त्यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने या दोघांचाही जामीन सशर्त मंजूर केला. या दोघांनाही त्यांचे पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे व महिन्याच्या अखेरीस संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवउच्च न्यायालयपोलिसकमलामिल्स