मुख्यालयानंतर आता कामोठे पोलीस ठाण्यात ‘पाळणा’
By admin | Published: July 24, 2014 12:10 AM2014-07-24T00:10:41+5:302014-07-24T00:10:41+5:30
महिला पोलीस कर्मचा:यांना बारा - बारा तास कर्तव्य बजवावे लागत असल्याने त्यांच्या लहान मुलांची गैरसोय होते.
Next
कामोठे : महिला पोलीस कर्मचा:यांना बारा - बारा तास कर्तव्य बजवावे लागत असल्याने त्यांच्या लहान मुलांची गैरसोय होते. मुलांची ओढाताण होऊ नये त्याचबरोबर संबंधीत महिला कर्मचा:यांची आपल्या बाळापासून ताटातूट होऊ नये याकरिता पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी पुढाकार घेऊन पाळणाघर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी कामोठे पोलीस ठाण्यात पाळणाघर सुरु करण्यात आले. या उपक्रमाचे महिला कर्मचा:यांनी स्वागत केले असून वरिष्ठ अधिका:यांचे आभार मानले आहे.
नवी मुंबई आयुक्तालयात नवी मुंबई महापालिका हद्द त्याचबरोबर पनवेल आणि उरण तालुक्याचा समावेश आहे. या ठिकाणी पोलीस ठाणो असून तेथे मोठय़ाप्रमाणात महिला कर्मचारी काम करतात. दरम्यान त्यांनाही कमीत कमी 12 तास डय़ुटी करावी लागते. त्याचबरोबर नवी मुंबईत आंदोलन, मोर्चे काढण्यात येतात. त्याचबरोबर सण, उत्सवामध्ये बंदोबस्तासाठी अनेक वेळा 12 ते 15 तासही घराबाहेर थांबावे लागते. अशावेळी घरात लहान मुलांची मोठी गैरसोय होते. पोलिसांच्या कामाची वेळ अनियमित असल्यामुळे खाजगी पाळणाघरात लाहन मुलांना ठेवून घेतले जात नाही. यामुळे आयुक्तालयातील प्रत्येक पेालीस स्टेशनमध्ये पाळणाघर असावे, अशी मागणी होवू लागली होती.
कर्मचा:यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी कळंबोलीमधील नवीन मुख्यालयामध्ये सर्वात पहिले पाळणाघर सुरु केले त्यानंतर इतर पोलीस ठाण्यातही पाळणाघर सुरु करण्याच्या सूचना देण्यात आला होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक o्रीराम मुल्लेमवार यांनी पुढाकार घेऊन पोलीस ठाण्यात पाळणाघर सुरु केले आहे. या करिता वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मुलांसाठी खेळणी व मनोरंजनाची इतर साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या पोलीस ठाण्यातही विवाहित आणि लेकुरवाळय़ा महिला काम करीत असून त्यांनाही पुरुषांप्रमाणोच कर्तव्ये पार पाडावी लागतात. अनेकदा जास्त काळही थांबावे लागत असल्याने मुलांची परवड होते. ती थांबविण्यासाठी पोलीस ठाण्यात पाळणाघर ही संकल्पना अतिशय चांगली असल्याचे पोलीस नाईक स्वाती शिंदे यांनी सांगितले. घरातील दोघेही नोकरीला असल्याने लहान मुले सांभाळण्यासाठी गावाहून कोणाला तरी बोलवावे लागते त्यांना कधी कधी अडचणी असल्याने बाहेरगावी जावे लागते. मुलांना ठेवायचे कुठे असा प्रश्न पडतो. पाळणाघर सुरु केल्याने मुलांना या ठिकाणी ठेवता येईल, असे शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)
कर्मचारी हित रक्षणाय
पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर कर्मचा:यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचबरोबर बदली प्रक्रियाही अतिशय सुलभ केली. कर्मचा:यांच्या सोयीनुसार नियुक्त्या दिल्या.
कर्मचा:यांसाठी
खास विo्रामगृह
पोलीस कर्मचारी बारा बारा तास डय़ुटी करतात कधी कधी तर हे तास वाढतात. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण, गुन्हे नियंत्रण अन्वेषण, पडताळणी, बंदोबस्त यासारखीकामे करावी लागतात. परिणामी पोलीस कर्मचारी सतत व्यस्त असतात. त्यांना विo्रांती मिळतच नाही त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. याचा विचार करुन मुल्लमेवार यांनी कामोठे पोलीस ठाण्यात महिला आणि पुरुष कर्मचा:यांसाठी स्वतंत्र विo्रामगृहाची व्यवस्था केली आहे.