बिल्डरविरोधात कामोठेकर आक्रमक

By admin | Published: June 10, 2015 10:32 PM2015-06-10T22:32:49+5:302015-06-10T22:32:49+5:30

कामोठे वसाहतीतील मानसरोवर कॉम्प्लेक्समधील रहिवासी सध्या अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. बिल्डरने विकास शुल्काच्या नावाने लाखो रुपये घेतले मात्र आवश्यक

Kamothehera Agrakak against builder | बिल्डरविरोधात कामोठेकर आक्रमक

बिल्डरविरोधात कामोठेकर आक्रमक

Next

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
कामोठे वसाहतीतील मानसरोवर कॉम्प्लेक्समधील रहिवासी सध्या अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. बिल्डरने विकास शुल्काच्या नावाने लाखो रुपये घेतले मात्र आवश्यक सुविधाही पुरवल्या नाहीत. त्यामुळे येथील सदनिकाधारक व गाळेधारक आक्र मक झाले असून बिल्डरविरोधात गुरुवारी मोर्चा काढणार आहेत.
कामोठे वसाहतीत सेक्टर- ३४ येथे भूखंड क्र मांक १, २,४,५,१९ ते २५ या ठिकाणी जेम्स डिसिल्वा या बांधकाम व्यावसायिकाने एकूण १५ इमारती उभारल्या. त्यामध्ये ९२२ सदनिका व १0९ गाळ्यांचा समावेश आहे. पैकी १३ इमारतींना २00३ साली भोगवटा प्रमाणपत्र मिळाले, तर दोन इमारतींना आजतागायत हे प्रमाणपत्र मिळालेले नाही.
सिडकोच्या नियमानुसार ९२२ घरांकरिता १५0 ते १८0 एमएमची पाइपलाइन असणे बंधनकारक आहे. मात्र त्याने फक्त ६0 एमएमचेच पाइप टाकल्याने पाणीटंचाईची समस्या भेडसावते. सिडकोला भरावयाचे सेवा शुल्क सदनिका व गाळेधारकांकडून बिल्डरने वसूल केले आहे. मात्र त्याने ती रक्कम सिडकोला अदा न केल्याने एक कोटी ७४ हजार इतकी थकबाकी झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने नियोजन गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाने वसुलीची नोटीस बजावली आहे.
बांधकामाच्या वेळी तात्पुरते वापराकरिता घेण्यात आलेल्या पाणी कनेक्शनची रक्कम सुध्दा त्याने सिडकोला अदा केली नाही. ही रक्कम ८४ लाख असल्याचेही सिडकोकडून कळविण्यात आले आहे. संकुलातील अग्निशमन यंत्रणाही निष्कृष्ट दर्जाची असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

Web Title: Kamothehera Agrakak against builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.