कांदिवली पूर्वमध्ये मतदारसंंघामध्ये भाजप आमदारालाच दिले माजी आमदाराने आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 02:12 AM2019-09-01T02:12:27+5:302019-09-01T02:12:33+5:30
कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या मुंबई महिला अध्यक्ष अजंता यादव आणि राजेंद्र शिरसाट यांच्यात मोठी चुरस आहे.
योगेश जंगम
मुंबई : कांदिवली पूर्वविधानसभा क्षेत्रात मराठी आणि गुजराती मतदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. २०१४मध्ये भाजपचे उमेदवार अतुल भातखळकर येथून विजयी झाले. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि या विधानसभा मतदारसंघात आमदार राहिलेले रमेश सिंग ठाकुर हेसुद्धा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे विद्यमान भाजप आमदाराला माजी आमदाराचेच आव्हान असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता भाजप कोणाला उमेदवारी देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या मुंबई महिला अध्यक्ष अजंता यादव आणि राजेंद्र शिरसाट यांच्यात मोठी चुरस आहे. या विभागासाठी राजेंद्र प्रताप पांडे, वीरेंद्र सिंह, शिव सहाय सिंह, आनंद राय हे काँग्रेसमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, तर मनसेकडून विभाग अध्यक्ष हेमंत कांबळे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांनी २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये कांदिवली पूर्वमधून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांना २३ हजार ३८५ मते मिळाली होती. यावेळी ते गोरेगाव पूर्वमधून निवडणूक लढविण्याची तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे या मतदार संघामध्ये प्राबल्य नाही. या विभागातून २०१४ साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर श्रीकांत मिश्रा यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना अवघी ३ हजार १८९ मते मिळाली होती. यंदा ते पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.
मतदारसंघाची रचना
च्या मतदारसंघामध्ये ९० हजार मराठी भाषिक आहेत, तर ७४ हजार गुजराती- मारवाडी, ६८ हजार उत्तर भारतीय, १८ हजार मुस्लीम आणि इतर भाषिक आहेत.
च्या मतदारसंघामध्ये १,५३,७०० पुरुष, तर १,१९,६०० महिला असे २,७३,३०० एकूण मतदार आहेत.
२००९ची स्थिती
च्२००९ मध्ये रमेशसिंग ठाकूर यांच्या रूपाने काँग्रेस, तर २०१४ मध्ये अतुल भातखळकर यांच्या रूपाने भाजपच्या पारड्यात इथल्या मतदारांनी आपले मत टाकले होते. यावेळी रमेशसिंग ठाकूर यांनी भाजपचे जयप्रकाश ठाकूर यांचा पराभव करत ११ हजार ३०६ मतांनी विजय मिळविला होता. त्यांना ५० हजार १३८ मते मिळाली होती, तर जयप्रकाश ठाकूर यांना ३८ हजार ८३२ मते मिळाली होती. मनसेच्या विनोद पवार यांनी २४ हजार ९१ मते मिळविल्याने रमेशसिंग ठाकूर यांचा विजय सोपा झाला होता. यावेळी सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती.
२०१४ची स्थिती
२०१४ साली भाजपने अतुल भातखळकर यांना रमेशसिंग ठाकूर यांच्या विरोधामध्ये तिकीट दिले. भातखळकर यांनी रमेश्सिंग ठाकूर यांचा तब्बल ४१ हजार १८८ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळविला. त्यांनी विभागामध्ये चांगली कामेही केली आहेत.
यंदा काय होणार?
च्यंदा जर युती झाली, तर येथील मतदारसंघ हा भाजपला जाण्याची शक्यता आहे, तर स्वतंत्र लढले, तर शिवसेना या ठिकाणी गुजराती उमेदवार उभा करू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे या ठिकाणी प्राबल्य नसल्याने काँग्रेसला ही जागा मिळू शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुशीत तयार झालेले अतुल भातखळकर १९९१ सालापासून भाजपसोबत आहेत. ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी भाजपसाठी काम केले आहे. पक्षाच्या रचनेत विविध पदांवर काम केलेल्या भातखळकरांनी सामाजिक विषय, विशेषत: पर्यावरणविषयक मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. २०१४मध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेल्या भातखळकरांनी पक्षात प्रदेश कार्यालय मंत्रिपदापासून सरचिटणीसपदापर्यंत जबाबदाºया पार पाडल्या आहेत. यामुळेच भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.