मोलकरणीचे मालकासोबत धक्कादायक कृत्य; व्हॉट्सॲपमुळे समोर सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:17 PM2024-10-17T15:17:27+5:302024-10-17T15:22:03+5:30

कांदिवलीमध्ये मोलकरणीने एका दाम्पत्याच्या घरी चोरी करुन पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

Kandivali maid ran away after stealing from a couple house | मोलकरणीचे मालकासोबत धक्कादायक कृत्य; व्हॉट्सॲपमुळे समोर सत्य

मोलकरणीचे मालकासोबत धक्कादायक कृत्य; व्हॉट्सॲपमुळे समोर सत्य

Mumbai Crime : गाझियाबादमध्ये पिठामध्ये लघवी मिसळून चपात्या बनवणाऱ्या एका मोलकरणीला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. लघवी मिसळलेल्या पिठापासून ही महिला चपात्या बनवून घरातील सदस्यांना खाऊ घालत होती. अशातच मुंबईतूनही एका मोलकरणीचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मोलकरणीने लाखोंची चोरी केल्याचे उघड झालं आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कांदिवली येथील एका व्यावसायिकाच्या घरी मोलकरणीने चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र मोलकरणीची चोरी व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून उघडकीस आली. व्यावसायिकाने समता नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी रुपाली सिंह विरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम ३०६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीने आमच्या घरी दोन नोकरांना कामावर ठेवले होते. यशोदा थापा जेवण बनवण्याचे काम करायची तर रुपाली सिंग घराची साफसफाई आणि आमच्या मुलाची काळजी घेत होती. 

रुपाली सिंह नावाची महिला कांदिवली येथील एका तरुण दाम्पत्याच्या घरी दोन वर्षांपासून काम करत होती. तीन बीएचके घर स्वच्छ ठेवणे आणि मुलांची काळजी घेणे हे तिचे काम होते. ७ ऑक्टोबर रोजी रुपाली सिंहने या जोडप्याला सांगितले की तिचे पालक वेगळे होत आहेत. त्यामुळे काम सोडून घरी जावे लागले आहे. त्यानंतर रुपाली तिथून गायब झाली. त्यानंतर शनिवारी घरातील मालकिणीने दसऱ्याला नेसण्यासाठी नवीन साडी शोधायला सुरुवात केली तेव्हा ती सापडली नाही. महिलेने रुपाली सिंगकडे  यासंदर्भात माहिती विचारली असता तिने साडी इस्त्री करून कपाटात ठेवल्याचे सांगितले. बराच वेळ शोधूनही महिलेला साडी सापडली नाही. त्यानंतर महिलेने सीसीटीव्ही तपासले असता रुपाली सिंह काही पिशव्या घेऊन घरातून निघून गेल्याचे दिसले.

त्यानंतर महिलेने व्हॉट्सॲप वापरत असताना रुपाली सिंहचे स्टेटस पाहिले. नोकरी सोडून गेलेल्या रुपाली सिंहने घातलेले घड्याळ आणि साडी घरातून चोरीला गेलेल्या वस्तूंशी जुळत होती. रुपालीचे स्टेटस पाहिल्यानंतर दाम्पत्याने घराची झडती घेतली असता दागिने, घड्याळे, साड्या, चष्मा, कपडे, शाल, मेकअप किट, परफ्युम, मुलांच्या बॅग, रोख रक्कम गायब असल्याचे आढळून आले. त्यांची किंमत सुमारे अडीच लाख रुपये होती. याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या रुपाली सिंहचा शोध घेत आहेत.
 

Web Title: Kandivali maid ran away after stealing from a couple house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.