Join us  

कांदिवलीत महापालिकेचा दवाखाना

By admin | Published: January 21, 2016 3:44 AM

कांदिवली येथील डहाणूकर वाडीत आता नवीन चार मजली महापालिकेचा दवाखाना उभा राहणार आहे. चार मजली दवाखान्याचा फायदा सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

मुंबई: कांदिवली येथील डहाणूकर वाडीत आता नवीन चार मजली महापालिकेचा दवाखाना उभा राहणार आहे. चार मजली दवाखान्याचा फायदा सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ४० वर्षांपूर्वी डहाणूकर वाडीत बैठ्या इमारतीत महापालिकेचा दवाखाना सुरु करण्यात आला होता. हा दवाखाना कुत्र्याचा दवाखाना म्हणून प्रसिद्ध होता. ६ महिन्यांपूर्वी हा दवाखाना तोडण्यात आला होता. या ठिकाणी सुसज्ज दवाखाना लवकरात लवकर सुरु व्हावा, यासाठी प्रभाग समितीत स्थानिक नगरसेविका शैलजा गिरकर यांनी विषय मांडला होता. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते दवाखान्याचे भूमिपूजन करण्यात आले. या ठिकाणी चार मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत आरोग्य केंद्र, दंत चिकित्सा आणि डायलेसिस सेवा सुरु करण्यात येणार आहे. कुत्रा आणि साप चावल्यानंतर देण्यात येणारी लस या केंद्रात उपलब्ध असणार आहे. या दवाखान्याच्या तळमजल्यावर वाहन तळ तयार करण्यात येणार आहे.केंद्राच्या आजूबाजूचा परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी व म्हाडाची वसाहत आहे. (प्रतिनिधी)