मुंबई : कांदिवली पूर्वेकडील हनुमान नगर परिसरात रस्त्यांच्या कडेला कचराकुंड्या ठेवल्या आहेत. दिवसभर कचरा साचून या कच-याकुंड्या ओव्हरफ्लो होतात. त्यामुळे बराच कचरा मुख्य रहदारीच्या रस्त्यावर येतो. सकाळच्या सुमारास कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान, सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.कांदिवली स्थानकापासून लोखंडवाला कॉम्प्लेक्स ते ठाकूर व्हिलेजला जाणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. पश्चिम दु्रतगती महामार्गाच्या बाजूस हनुमान नगर परिसर आहे. येथील रस्ता हा अरुंद असून सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. कचºयामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण आहे.हनुमान नगर परिसरात कचºयाची खूप मोठी समस्या आहे. कचºयाची योग्य विल्हेवाट लावावी, यासाठी महापालिकेला पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आला होता. मात्र, पत्रांची दखल घेतली गेली नाही. वेळोवेळी रस्त्यावरचा संपूर्ण कचरा उचलावा किंवा कचराकुंडी दुसºया जागी हलवावी, अशी मागणी संतोष शेट्टी यांनी केली आहे.
कांदिवलीत कचऱ्याचा ढीग, घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 2:27 AM