Join us

जुहू पोलीस ठाण्यात चौकशीसाठी कंगना गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:06 AM

जावेद अख्तर मानहानी प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी कोर्टात धाव घेत मानहानीचा ...

जावेद अख्तर मानहानी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी कोर्टात धाव घेत मानहानीचा आरोप केल्यानंतर जुहू पोलिसांनी अभिनेत्री कंगना रनाैतला चौकशीसाठी शुक्रवारी हजर राहण्याचे समन्स पाठविले होते. मात्र ती पोलीस ठाण्यात हजर झाली नसून, यामागचे कारण तिच्या वकिलांनी पोलिसांना कळविल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांच्या समन्सनुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहणे आवश्यक होते. अख्तर यांनी केलेल्या आरोपाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश अंधेरी कोर्टाने जुहू पोलिसांना दिले आहेत. यासंदर्भातील चौकशीसाठी कंगनाला बोलावण्यात आले होते. मात्र ती गैरहजर राहिली. कंगनाने माध्यमांसमाेर अख्तर यांच्याबाबत अपमानास्पद आणि मानहानी करणारे वक्तव्य केले, असा अख्तर यांचा आरोप आहे. त्यानुसार जुहू पोलिसांना १ फेब्रुवारी, २०२१ रोजी याबाबतचा अहवाल अंधेरी कोर्टासमोर सादर करायचा आहे.

..............................