मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मुंबईउच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली आहे. याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली आहे. दरम्यान कंगनाच्या कार्यालयावरील महानगरपालिकेने सुरु केलेली कारवाई तुर्तास थांबवली आहे. कार्यालयाच्या तळमजल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. न्यायालयात सुनावणीपर्यंत कारवाई थांबवण्यात आली. कार्यालयाच्या आत कारवाई करणारे कर्मचारी घराबाहेर पडले. कंगनाच्या कार्यालयावर तब्बल दीड तास कारवाई केली. सर्व साहित्य घेऊन कर्मचारी घराबाहेर पडले.मुंबई महानगरपालिका आज अभिनेत्री कंगना राणौतच्या अनाधिकृत कार्यालयावर कारवाई करणार होती. उच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश देताच आता पालिकेनेने ही कारवाई तुर्तास थांबवली आहे. त्यामुळे कंगनाला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कंगनाच्या याचिकेवर स्थगिती आणण्यात आली आहे. उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगिती दिली आहे.कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असून सुनावणीला झाली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.कंगनाने मुंबईची पीओकेशी तुलना केली होती. त्यानंतर, शिवसेना आणि कंगनामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. कंगनाला मात्र शिवसेनेची पंगा घेणं महागात पडलं आहे. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई सुरु केली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार
मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन
वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!
खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण
रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत
सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार
‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’
लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी