कंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, बाळासाहेबांची मुलाखत शेअर करत लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 10:31 AM2020-09-11T10:31:32+5:302020-09-11T10:52:54+5:30
आज कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगनाने शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी कंगनाबाबत बोलण्याचे टाळण्यास सुरुवाच केली असली तरी कंगना राणौतकडून याविषयी ट्विटरवरून टिवटिव सुरूच आहे. दरम्यान, आज कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगनाने शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
महान नेते असलेले बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडीच्या नेत्यांपैकी आणि आदर्शांपैकी एक होते. कधीतरी शिवसेना गटातटाच्या राजकारणात सामील होईल आणि काँग्रेस बनेल, अशी भीती त्यांना वाटायची. आता त्यांच्या पक्षाची सध्याची पाहून त्यांची भावना काय असली असती.
Great Bala Saheb Thakeray one of my most favourite icons, his biggest fear was some day Shiv Sena will do Gutbandhan and become congress @INCIndia I want to know what is his conscious feeling today looking at the condition of his party ? pic.twitter.com/quVpZkj407
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 11, 2020
दरम्यान, कंगनाने याआधीच्या ट्विटमध्ये कंगनाने आपण बीएमसीने तोडलेले कार्यालय नव्याने बांधणार नसल्याचे सांगितले होते. मी १५ जानेवारीला हे कार्यालय सुरू केले होते. मात्र काही दिवसांतच कोरोना आला. त्यामुळे इतरांप्रमाणे मीसुद्धा तेव्हापासून काम केलेले नाही. आता नव्याने ऑफीस उभे करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्यामुळे मी माझ्या तुटलेल्या ऑफी,मधूनच काम करणार आहे. तसेच एका महिलेने जगाशी टक्कर घेतल्याची आठवण म्हणून जपून ठेवणार आहे. #KanganaVsUddhav
कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन; मनपाकडून कारवाईचे समर्थन
अभिनेत्री कंगना रनौत हिने गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिका आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभी केली, तीच विचारधारा सत्तेसाठी विकून शिवसेनेची सोनिया सेना बनली आहे, अशा शब्दांत कंगनाने शाब्दिक फटकारे लगावले. मात्र त्याला शिवसेनेकडून तिला काहीच प्रत्युत्तर देण्यात आले नाही. तर दुसरीकडे, कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईचे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात समर्थन केले. न्यायालयाने पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी ठेवली.
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगनाला भारी पडणार; विक्रोळीत तक्रार दाखल
कंगनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच एकेरी उल्लेख करणं महागात पडणार आहे. याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तक्रार दाखल केली आहे. नितीन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार नितीश माने यांनी कंगना हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे तुझे क्या लगता है! कि तुने फिल्म माफिया के साथ मिल के मेरा घर तोडकर बडा बदला लिया है असे बदनामीकारक व्हिडीओ अपलोड केला म्हणून तक्रार दाखल केली.
...कल तेरा घमंड टुटेगा; उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कंगनाने व्यक्त केला होता संताप
''उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही बॉलिवूड माफियासोबत मिळून माझं घर उध्वस्त करून बदला घेतला आहेस. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार तुटेल. वेळ नेमही एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर उपकार केले.. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होतं, परंतु आज मी ते स्वतः अनुभवलं. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,''असं कंगनानं ट्विट केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी