कंगना आज राज्यपालांची भेट घेणार , कार्यालयावरील कारवाईबाबत तक्रार करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 10:03 AM2020-09-13T10:03:59+5:302020-09-13T10:06:31+5:30

मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी तिच्या कार्यालयातील अनधिकृत बंधकामावर कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर कंगना राणौत आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.

Kangana Ranaut to meet Governor bhagat singh koshyari today, complain about office action? | कंगना आज राज्यपालांची भेट घेणार , कार्यालयावरील कारवाईबाबत तक्रार करणार?

कंगना आज राज्यपालांची भेट घेणार , कार्यालयावरील कारवाईबाबत तक्रार करणार?

Next

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर केलेली जहरी टीका आणि मुंबईची पीओकेशी तुलना केल्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत वादात सापडली असून, मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी तिच्या कार्यालयातील अनधिकृत बंधकामावर कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर कंगना राणौत आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये कंगना आपल्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांकडे तक्रार करण्याची शक्यता आङे.

आज संध्याकाळी साडे चारच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कंगना आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आता पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. त्यातून आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

'कंगनाला नुकसान भरपाई द्या,  बीएमसीमधील अधिकाऱ्यांवर कारवाई करा'
शिवसेना-कंगना वाद जोर धरत असतानाच रामदास आठवले कंगनाच्या भेटीला तिच्या घरी गेले होते. मुंबईतील ऑफिस तोडल्याप्रकरणी आणि मुंबईत सुरक्षा दिल्यानंतर आठवलेंनी तिच्याशी चर्चा केली. त्यानंतर, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत कंगनावर अन्याय झाल्याची खंत व्यक्त केली.  गुरुवारी कंगना आणि रामदास आठवले यांच्या तब्बल 1 तास चर्चा झाली. त्यामध्ये सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासून ते मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी, रामदास आठवेंली घरी येऊन भेट घेतल्याबद्दल तिने आभार मानले. तसेच, आपण माझ्या घरी आलात हे माझे सौभाग्य आहे, आपले आशीर्वाद मला हवेत. आपण आमच्या हिमाचलमधील घरी यावे, आपला पाहुणचार करायची संध्या द्यावी, असे कंगनाने म्हटले. तसेच, डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचा मला अभिमान असल्याचेही कंगना म्हणाली. तर, रिपाइं तुमच्या पाठिशी असल्याचे आठवलेंनी आश्वस्त केलं. 

शिवसेना-कंगना वादात आता राज्यपालांची उडी, राज्य सरकारविरोधात केंद्नाकडे अहवाल पाठवणार?
राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या कंगना राणौतच्या कार्यालयावर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने कंगनाला दणका दिला होता. दरम्यान, कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली असून, त्याबाबतची माहिती राज्य सरकारला देण्याची सूचना राज्यपालांनी केल्याचे वृत्त आहे. तसेच राज्यपाल याबाबत राज्य सरकारविरोधात केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार, असल्याची माहिती टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Web Title: Kangana Ranaut to meet Governor bhagat singh koshyari today, complain about office action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.