ठळक मुद्देमाझ्यावर वार करण्यात आला, पण तो मी विमानात असताना मागून करण्यात आलामला समोरून नोटिस देण्याची किंवा समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद सध्या कमालीचा विकोपाला
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेला वाद सध्या कमालीचा विकोपाला गेला आहे. मुंबईची पीओकेशी तुलना करणाऱ्या कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर कंगना राणौत अधिकच संतप्त झाली असून, तिने मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यालयाला भेट देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिले होते. त्यानंतर बुधवारी रात्री कंगनाने शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा डिवचले आहे. मला समोरून नोटिस देण्याची आणि समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही, असा टोला कंगना राणौत हिने लगावला आहे.कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादात बुधवारी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री कंगनाने ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. रात्री केलेल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मी आता आपल्या मुंबईत आहे. आपल्या घरात आहे. माझ्यावर वारसुद्धा करण्यात आला, पण तो मी विमानात असताना मागून करण्यात आला. मला समोरून नोटिस देण्याची किंवा समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही. मझ्या कार्यालयाच्या करण्यात आलेल्या नुकसानामुळे अनेक लोक दु:खी आणि चिंतीत आहेत. मी त्यांचे आशीर्वाद आणि प्रेमासाठी ऋणी आहे.
दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर तोडक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या अभिनेत्री कंगना रनौतने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ह्यआज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेलह्ण, काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो, असे सांगतानाच बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ या निमित्ताने उघड झाल्याचा आरोप कंगनाने केला.मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची अवस्था व्हिडीओ टिष्ट्वटरवर पोस्ट करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडीओ पोस्ट केला. यात मुखमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते, फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठा बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा हे नेहमीच सारखे नसते.अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्रे, पाली हिल येथील कार्यालयातील नियमबाह्य बांधकामाप्रकरणी दिलेल्या नोटीसची मुदत बुधवारी सकाळी संपली. बांधकामासाठी पालिकेकडून घेतलेल्या परवानगीची कागदपत्रे तिने २४ तासांच्या मुदतीत सादर न केल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाने सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस फौजफाट्यासह कारवाईला सुरुवात केली. सुमारे दोन तास चाललेली ही कारवाई, मुंबई उच्च न्यायलयातून स्थगितीचे आदेश आल्यानंतर थांबविण्यात आली होती.कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांनी व्यक्त केली नाराजीकंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली असून, त्याबाबतची माहिती राज्य सरकारला देण्याची सूचना राज्यपालांनी केल्याचे वृत्त आहे ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत - देवेंद्र फडणवीसअभिनेत्री कंगना रनौत हिच्या घराचे बांधकाम ज्या पद्धतीने पाडण्यात आले त्यावरून राज्यात सरकार पुरस्कृत दहशत सुरू असल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतके घाबरट आणि लोकशाहीविरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेले नाही. आपल्या विचारांचा विरोध करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार या सर्वांना दाबण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याने मुंबई, महाराष्ट्राचा अवमान होतो त्याचे समर्थन करता येत नाही; पण सरकारच्या अशा दहशतीचेही समर्थन करता येणार नाही. या कृतीमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी