कांजूरमार्ग, वडाळ्यातील मिठागरांत निवास योजना, अपात्र धारावीकरांसाठी भाड्याची घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 12:52 PM2024-09-07T12:52:33+5:302024-09-07T12:52:53+5:30

Mumbai News: केंद्रीय मंत्रिमंडळाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी कांजूर मार्ग, भांडुप आणि वडाळ्यातील मिठागरांची २५६ एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Kanjur Marg, Mithagarant Niwas Yojana in Wadala, rental houses for ineligible Dharavikars | कांजूरमार्ग, वडाळ्यातील मिठागरांत निवास योजना, अपात्र धारावीकरांसाठी भाड्याची घरे

कांजूरमार्ग, वडाळ्यातील मिठागरांत निवास योजना, अपात्र धारावीकरांसाठी भाड्याची घरे

 मुंबई  - केंद्रीय मंत्रिमंडळाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी कांजूर मार्ग, भांडुप आणि वडाळ्यातील मिठागरांची २५६ एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता या जमिनीवर धारावीतील अपात्र झोपडपट्टी रहिवाशांसाठी भाड्याची घरे बांधण्यात येतील. 

राज्य सरकारने मुंबईतील बंद आणि भाडेपट्टा संपलेल्या कांजूरमार्ग येथील आर्थर सॉल्ट वर्क्स (१२०.५ एकर), जेनकिन्स सॉल्ट वर्क्स (७७ एकर), मुलुंड येथील जामास्प सॉल्ट वर्क्स (५८.५ एकर) आणि वडाळा येथील सुलेमान शाह मिठागर (२८ एकर) यांच्या जमिनींची माहिती संकलित केली होती. या जमिनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील मिठागर आयुक्तालयाच्या ताब्यात असल्याने धारावी प्रकल्पासाठी त्या जमिनी मिळाव्यात, यासाठी राज्याने केंद्र सरकारचा दरवाजा ठोठावला होता. आता केंद्राकडून ही जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित झाल्यानंतर ती बाजारभावानुसार धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडला वापरण्यासाठी दिली जाईल.

 

Web Title: Kanjur Marg, Mithagarant Niwas Yojana in Wadala, rental houses for ineligible Dharavikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.