कांजूरमार्ग स्टेशन :रूपडे पालटले, पण सुरक्षा ऐरणीवरच! स्थानकप्रमुखाचे पद रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 03:07 AM2017-10-15T03:07:04+5:302017-10-15T03:55:27+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग हे रेल्वे स्थानक धावत्या लोकलमधून पाहिले, तर तसे सामसूम दिसते. नुकतेच येथे एक नवा प्लॅटफॉर्म बांधण्यात आल्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. गर्दीच्या नियोजनास मदत होऊन स्थानकाचे रूपडेही पालटले आहे.

Kanjurmarg Station: Rupeda changed, but on safety alert! Vacancy of station head vacant | कांजूरमार्ग स्टेशन :रूपडे पालटले, पण सुरक्षा ऐरणीवरच! स्थानकप्रमुखाचे पद रिक्तच

कांजूरमार्ग स्टेशन :रूपडे पालटले, पण सुरक्षा ऐरणीवरच! स्थानकप्रमुखाचे पद रिक्तच

googlenewsNext

- कुलदीप घायवट 

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग हे रेल्वे स्थानक धावत्या लोकलमधून पाहिले, तर तसे सामसूम दिसते. नुकतेच येथे एक नवा प्लॅटफॉर्म बांधण्यात आल्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. गर्दीच्या नियोजनास मदत होऊन स्थानकाचे रूपडेही पालटले आहे. तरीही प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसे थे आहे. एक नवा प्लॅटफॉर्म सोडल्यास अपुºया तिकीट खिडक्या, फलाटावरील प्रवेशाच्या मार्गावरच असणारी अस्वच्छता, प्लॅस्टिकच्या कचºयांचे ढीग, सतत जाणारे दिवे अशा अनेक समस्यांनी स्थानकाला वेढलेले आहे. नवख्या प्रवाशाला येथून प्रवास करणे अत्यंत असुरक्षित आहे.
कांजूरमार्ग स्थानकांवर एकूण तीन पादचारी पूल आहेत. यामधील ठाण्याच्या दिशेकडील व सीएसएमटी दिशेकडील पूल खूपच निमुळता आहे. येथे नवीन फलाट बांधण्यात आला असला, तरी अजूनही अनेक जण जुन्याच फलाटाचा, तेथील पुलाच वापर करतात. या फलाटावरील पूल अरुंद असून, पायºया तुटलेल्या आहेत. त्यामुळे तुटलेल्या पायºयांवरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरुंद जिन्यांवरून चढ-उतार करताना वृद्ध, महिला, मुलांची गैरसोय होते.
कांजूरमार्ग स्थानक १९६८ साली बांधण्यात आले. गर्दीचे व्यवस्थापन करताना, या स्थानकामध्ये बºयाच सुधारणा करण्यात आल्या. तरीदेखील आताच्या लोकसंख्येचा विचार केला, तर या उपाययोजना अपुºया ठरत आहेत. नवीन छप्पर, फलाट बांधण्यात आल्यामुळे लोकलमधून हे स्थानक अतिशय सुंदर दिसते. प्रत्यक्षात येथील प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करतच प्रवास करावा लागत आहे. येथे स्वयंचलित जिना आहे, पण अनेकदा हा जिना बंदच असतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांच्या तुलनेत येथील तिकीट खिडक्या अपुºया असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. छपरांवर प्लॅस्टिकच्या कचºयाने घर केले आहे. रेल्वे पोलिसांच्या नावाने तर बोंबच आहे. अपुरे सफाई कर्मचारी, लाइटची बिकट अवस्था, स्थानकात शिरण्याआधीच होणारे अस्वच्छतेचे दर्शन, यामुळे ‘दुरून डोंगर साजरे’ अशीच काहीशी अवस्था या स्थानकाची झाली आहे.
स्थानकाला पूर्ण वेळ स्टेशन मास्तर नाही. स्थानकांचा कारभार इतर अधिकारी पाहतात. त्यामुळे तक्रार करायची कुठे? असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. हेही नसे थोडके म्हणूनच की काय, पण विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकासाठी केवळ एकच पोलीस असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. सफाई कर्मचाºयांबाबतही अशीच काहीशी अवस्था आहे. त्यामुळे येथील सुरक्षा आणि स्वच्छता दोन्हीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कांजूरमार्ग हे मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक. आयआयटी बॉम्बे, पवई, हिरानंदानी गार्डन्स अशा प्रमुख ठिकाणांसाठी हे रेल्वे स्थानक प्रवेशाचा केंद्रबिंदू आहे. कामानिमित्ताने लाखोंच्या संख्येने मुंबईकर, ठाणेकर, तसेच इतर अनेक लांबच्या पल्ल्यावरून प्रवासी येथे मोठ्या संख्येने येतात. स्थानकांवर चाकरमान्यांची रहदारी कायम असते.

अरुंद पूल
कांजूरमार्ग स्थानकावरील दोन पूल अरुंद आहेत. ठाणे व सीएसएमटी अशा दोन्ही दिशेकडून एकाच वेळी गाड्या स्थानकात आल्यास, अरुंद पुलावर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे एल्फिन्स्टन-परळ पुलावरील चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना येथेही घडू शकते. ज्या पुलाचा वापर केला जातो, ते पूल अरुंद आहेत, तर याउलट ज्या पुलाचा वापर कमी आहे, त्याची रुंदी अधिक आहे.
- श्रीनिवास शर्मा, प्रवासी

रेल्वे पोलिसांसाठी प्रस्ताव
मागील दोन महिन्यांपूर्वीच स्थानकांच्या अनेक समस्यांचे निवारण करण्याबद्दल बैठक झाली. या आधी फलाटांची उंची वाढविणे, छप्पर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वात आधी स्वयंचलित जिन्यांची मागणी आम्ही केली. त्यानंतर, एक जिना लावण्यात आला. आताच्या लोकसंख्येनुसार अजून नवीन उपाययोजना हाती घेणार आहोत. रेल्वे प्रशासनाकडे स्टेशन मास्तरसह, रेल्वे पोलीस, सफाई कामगार उपलब्ध करून देण्यासाठीचा आमचा प्रस्ताव आहे.
- मंगेश सांगळे, माजी आमदार

निमुळता पूल
आम्ही वेळोवेळी पत्राद्वारे पाठपुरावा करत आहोत. त्यामुळे काहीशा प्रमाणात सुधारणा झालेली आहे. असे केले नसते, तर एल्फिन्स्टन-परळ सारखी दुर्घटना येथेही घडली असती. कांजूरमार्ग स्थानकांवर व्यवस्थित लाइट नाही. ठाणे दिशेकडील पूल हा निमुळता आहे. त्याची रुंदी वाढवणे गरजेचे आहे. एकच तिकीट खिडकी आहे. त्यावर विचारणा केली असता म्हणाले की, आमच्याकडे मनुष्यबळ नाही, असे सांगण्यात येते.
- गणेश (अण्णा) मुळे पाटील,
उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, ईशान्य मुंबई जिल्हा

सुरक्षा वा-यावर
कांजूरमार्ग स्थानकाला नवीन उभारी देण्यात आली खरी, पण त्याची देखभाल ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. स्थानकावरील काही तिकीट खिडक्या बंदच असतात. नेत्यांची भाषणे झाल्यावर त्याचा परिणाम फक्त एक दिवसापुरता राहतो. दुसºया दिवशी नेहमीसारखीच परिस्थिती असते. शौचालयाची दुरवस्था झाल्याने प्रवासी तेथे जाणे टाळतात. स्थानकांवर रेल्वे पोलीस कधीच पाहायला मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा वाºयावर आहे. सोशल मीडियाद्वारे प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे.
- मयूर मांडवकर, रेल्वे प्रवासी

गर्दुल्ल्यांचे अड्डे
अपु-या प्रकाश व्यवस्थेमुळे कांजूरमार्ग पूर्व व पश्चिमेला आणि गांधीनगरला जोडणाºया रेल्वे पुलावर गर्दुल्ल्यांचे अड्डे तयार झाले आहेत. येथे रेल्वे पोलीसही नसतात. त्यामुळेच गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- महेंद्र एकनाथ रावले, उपशाखा अध्यक्ष, मनसे, कांजूरमार्ग

पोलीस चौकी हवी
कांजूरमार्ग स्टेशनला स्टेशन मास्टरच नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कांजूरमार्ग स्थानकांच्या प्रवेशाद्वारावरच अस्वच्छता दिसून येते. फेरीवाल्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे फेरीवाल्यांकडूनही येथे अस्वच्छतेत भर पडत आहे. रेल्वे सुरक्षा पोलीस अभावानेच दिसतो.
- गणपत भणगे, भाजपा कार्यकर्ते

ठोस पावले उचलावीत
घाटकोपर ते कांजूरमार्ग असा माझा रोजचा प्रवास आहे. माझी दिवसपाळी-रात्रपाळी असते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ प्रवास असतो. कधीही प्रवास केला, तरी गर्दीचा सामना करावाच लागतो. धक्काबुक्की झाली की भांडणे, मारामाºया होतात. असे प्रकार थांबावेत, यासाठी रेल्वे प्रशासनाने गर्दीचे नियोजन करून, समस्यांवर ठोस पावले उचलावीत.
- दिलीप शेगवण, प्रवासी

Web Title: Kanjurmarg Station: Rupeda changed, but on safety alert! Vacancy of station head vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.