अक्षयपेक्षाही तैमूर पॉप्युलर, लोकमतच्या व्यासपीठावर करीना कपूरने दिली दिलखुलास उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:38 AM2018-04-12T01:38:07+5:302018-04-12T01:38:07+5:30

खून से पंजाबी हूँ पर दिल से मराठी हूँ लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयरच्या पॉवर आयकॉन पुरस्काराची मानकरी ठरल्यानंतर अभिनेत्री करीना कपूरने आपलं महाराष्ट्राविषयचं प्रेम व्यक्त केलं.

Kareena Kapoor gives answer on Lokmat event | अक्षयपेक्षाही तैमूर पॉप्युलर, लोकमतच्या व्यासपीठावर करीना कपूरने दिली दिलखुलास उत्तरे

अक्षयपेक्षाही तैमूर पॉप्युलर, लोकमतच्या व्यासपीठावर करीना कपूरने दिली दिलखुलास उत्तरे

Next

मुंबई : खून से पंजाबी हूँ पर दिल से मराठी हूँ लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयरच्या पॉवर आयकॉन पुरस्काराची मानकरी ठरल्यानंतर अभिनेत्री करीना कपूरने आपलं महाराष्ट्राविषयचं प्रेम व्यक्त केलं. मंगळवारी झालेल्या या शानदार सोहळ््यात तिची छोटेखानी मुलाखतही झाली आणि तिला या मुलाखतीत बोलतं केलं स्पोर्टस प्रेझेंटर रिध्दीमा पाठकने.
महाराष्ट्रात जन्माला आल्याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रातील माणसांमध्ये खूप सकारात्मकता आणि कष्ट करण्याची ताकद असते अशा शब्दांत करीनाने मुलाखतीच्या सुरवातीलाच आपलं महाराष्ट्राविषयीचं प्रेम व्यक्त केलं. मुंबई तुम्हांला सगळं काही शिकवते. हे शहर २४ तास अलर्ट असतं. या शहराचा मी एक भाग आहे याचा अभिमान वाटतो. एक यशस्वी स्त्री म्हणून मी इतर स्त्रियांना संदेश देण्याइतकी मी मोठी नाहीये. पण देशातील प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वी ठरतायत. कॉमनवेल्थ स्पर्धेत सवार्धिक मेडल्स ही स्त्रियांनी मिळवलीयत. पत्रकारितेमध्येही महिलांंची संख्या वाढतेय याचं मला एक स्त्री म्हणून फार कौतुक वाटतं.
तैमूरने मोठं होऊन काय व्हावं असं तुला वाटतं, असा प्रश्न विचारल्यावर करीना म्हणाली की, मी माझी मतं त्याच्यावर लादणार नाही. त्याला ज्या क्षेत्रात जावंस वाटतं, त्या क्षेत्रामध्ये त्याने काम करावं. पण मला विचाराल, तर तैमूरने क्रिकेटपटू व्हावं, अशी माझी इच्छा आहे. 'तैमूरला मिळणारी लोकप्रियता अक्षयसाठी धोकादायक ठरु शकते,' असं करिना गमतीनं म्हणाली.
करीनाने पॉवर आयकॉन हा पुरस्कार स्वीकाराल्यानंतर लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी करीनाला काही प्रश्न विचारले. कपूर खानदानाने सामाजिक विषयांवर खूप काम केलं आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत, तसंच मुलींच्या शिक्षणाचाही प्रश्न आहे यावर तुला काय वाटतं असा प्रश्न विजय दर्डा यांनी केला त्यावर महाराष्ट्र सरकारने सेंकडरी, हायर सेंकडरी असं सर्व शिक्षण मुलींसाठी मोफत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांच्या समक्षच केली. शेतकºयांसाठी ठोस उपाययोजनांची गरज असून त्यामुळेच आत्महत्या थांबतील असं करीना म्हणाली.

Web Title: Kareena Kapoor gives answer on Lokmat event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.