Join us

करीना कपूरला दोन लहान मुलं आहेत, तरी इतकं बिनधास्त?; किशोरी पेडणेकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 9:16 PM

करीना कपूर आणि अमृता अरोरा सध्या होम क्वारंटाईन आहेत. दोघींवर पालिकेचं लक्ष आहे.

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि तिची जवळची मैत्रिण अमृता अरोरा (Amrita Arora) या दोघींना कोरोनाची लागण झाली आहे. या अभिनेत्रींनी अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे या अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महापालिकेने करीना व अमृताच्या संपर्कात येणाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

करीना कपूर आणि अमृता अरोरा सध्या होम क्वारंटाईन आहेत. दोघींवर पालिकेचं लक्ष आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्री ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आल्या आहेत, त्या सर्वांची आता कोरोना चाचणी करण्यास मुंबई महापालकेच्या आरोग्य विभागाने सुरवात केली आहे. 

करीना आणि अमृता या दोन्ही अभिनेंत्रींना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बॉलिवूडमधील जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीने वागले पाहिजे, असं म्हटलं आहे. बॉलिवूडकरांनी नियम पाळायला हवेत. तसेच राजकिय लोकांनीदेखील नियमांचे पालन करायला हवे. ग्रॅन्ड हयातमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नियम मोडले जात आहेत, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

बॉलिवूड आणि राजकिय क्षेत्रातील लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच करीना कपूरला दोन लहान मुलं आहेत, तरी इतकं बिनधास्त कसे?, असा सवाल देखील किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे राजकिय व्यक्तींनीदेखील नियम पाळले पाहिजेत, हे सांगायला देखील किशोरी पेडणेकर विसरल्या नाहीत. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी करिना, करिश्मा करण जोहरच्या पार्टीत हजर झाल्या होत्या. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही पार्टी आयोजित केली गेली होती. पण कदाचित याच पार्ट्या करिना व अमृताला भोवल्या आहेत. करिना व अमृताच्या संपर्कात आलेल्या अनेकांनी कोरोना चाचणी केली आहे. त्यांचे रिपोर्ट लवकरच येणार आहेत. यात काही बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं असल्याचं कळते.

टॅग्स :करिना कपूरकिशोरी पेडणेकरकोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका