मुंबईत काेराेनाचा दैनंदिन मृत्यू एकेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:09 AM2020-12-30T04:09:22+5:302020-12-30T04:09:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत मंगळवारी कोरोनाच्या तीव्र संसर्गानंतर वर्ष अखेरीस पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंची संख्या ६ वर आली. ...

Kareena's daily single death in Mumbai | मुंबईत काेराेनाचा दैनंदिन मृत्यू एकेरी

मुंबईत काेराेनाचा दैनंदिन मृत्यू एकेरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत मंगळवारी कोरोनाच्या तीव्र संसर्गानंतर वर्ष अखेरीस पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंची संख्या ६ वर आली. शिवाय, रुग्ण दुपटीचा कालावधीही ३६५ दिवसांवर पोहोचला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे.

मुंबईत आतापर्यंत २ लाख ७१ हजार ८७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ८ हजार १६८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी दिवसभरात ४८६ रुग्ण आणि ६ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, बाधितांची एकूण संख्या २ लाख ९२ हजार ८ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार ९४ झाला आहे.

मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या २९० असून २ हजार ५६१ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने २ हजार ५८७ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.

Web Title: Kareena's daily single death in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.